शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना

By admin | Updated: August 11, 2015 23:16 IST

जिल्हास्तरावर समिती गठित : एनएची अट शिथिल

जिल्हास्तरावर समिती गठित : एनएची अट शिथिल
नागपूर : उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या मेक इन इंडियाच्या धर्तीवर राज्य शासनाने मेक इन महाराष्ट्र कार्यक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत उद्योग स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या नव्या उद्योजकांना एकाच जागी मिळाव्यात यासाठी राज्य सरकारने एक खिडकी योजना सुरू केली आहे. यासाठी जिल्हास्तरावर समितीही गठित करण्यात आली आहे. यासोबतच उद्योजकांसाठी अकृषक(एनए)ची अटही शिथिल करण्यात आली आहे.
उद्योग उभारण्याच्या वेळी एनएची अट महत्त्वाची मानल्या जाते. एनए परवानगीसाठी उद्योजकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र आता एनएची परवानगी नसल्यावरही उद्योग सुरू करता येणार आहे. एनएची परवानगी नियमात असल्यास उद्योग स्थापन केल्यानंतरही ही परवानगी घेता येणार आहे. खऱ्या औद्योगिक प्रयोजनासाठी आणि विशेष वसाहत प्रकल्पाकरिता एनएची परवानगी आवश्यक नाही अशी सुधारणाच राज्य शासनाने जमीन महसूल कायद्यात केली असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक अकृषक वापर समितीही गठित करण्यात आली आहे. या समितींतर्गत उद्योग स्थापन्यासाठी आलेले अर्ज १५ दिवसात निकाली काढण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. ही समिती महिन्याला दोनवेळा बैठक घेणार असून, नुकतीच समितीची बैठक झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. नवीन उद्योग स्थापन्यासाठी उद्योजकांना येणाऱ्या अडचणी दूर करून उद्योगाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, उद्योगाला लागणाऱ्या सर्व परवानग्या एकाच जागेवर मिळाव्यात म्हणून एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. उद्योजकांनी मेक इन महाराष्ट्र कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आणि उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके यांनी केले आहे.