शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एक होता स्वातंत्र्यवाला, एक यशस्वी प्रयोग

By admin | Updated: August 26, 2015 00:18 IST

फोटो रॅपवर

फोटो रॅपवर
- भाजप सांस्कृतिक आघाडीचे आयोजन : एकांकिका मालिकेतील सादरीकरण
नागपूर : देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झालीत पण खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र झालो का? याचा भावस्पर्शी आढावा घेणाऱ्या एकांकिकेच्या प्रयोगाला रसिकांनी दाद दिली. भाजप सांस्कृतिक आघाडीच्यावतीने युवा रंगकर्मी कुणाल गडेकर यांच्या संकल्पनेतून मासिक एकांकिका सादरीकरणाच्या मालिकेत ही एकांकिका सादर करण्यात आली. युवा रंगकर्मी कुणाल गडेकर यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या एकांकिकेचा प्रयोग कुणाल गडेकर आणि माधवी पांडे यांच्या निर्मितीतून करण्यात आला. हा प्रयोग साईकृपा मंगल कार्यालय, रहाटे कॉलनी येथे सादर करण्यात आला.
धूर्त प्रवृत्तीचा फ्रिडम नावाचा माणूस स्वातंत्र्याचे दुकान उघडतो. दुकानात येणाऱ्यांना सल्ले देण्याचे काम तो करतो. गिरणी कामगाराला पगारात वाढ होत नसल्याने उपोषण करण्याचा, तर मुस्लिम बांधवाच्या मनात कायम उणीव निर्माण करण्याचा आणि समाजात दुही पसरविण्याचे कार्य येथून होते. या सल्लागाराचा सचिव सल्लागाराच्या कृतीच्या विरोधात न्यायालयात दाद मागायला जातो, तेव्हा न्यायाधीश हा प्रश्न जनतेच्याच विवेक बुद्धीवर सोडून देतात, अशी या एकांकिकेची मध्यवर्ती कल्पना आहे. या एकांकि केचे लेखन अभिनेते अभिजित गुरु यांनी केले आहे. दिग्दर्शन ज्येष्ठ रंगकर्मी कि शोर कुळकर्णी यांनी केले. नाटकात आदित्य घुळघुळे, रोहित घांग्रेकर, अभय देशमुख, अश्विनी गेडाम, आशय नालमवार, कौस्तुभ पांडे, योगेश धांडे, हिमानी निखाडे, गौरी दीक्षित, कुणाल गोरले यांनी उत्कृष्ट भूमिका केल्या. नाटकाचे सुत्रधार मकरंद भालेराव, निर्मिती सहाय्य अभय देशमुख, संगीत गौरी सोनटक्के, प्रकाशयोजना अमित आंबुलकर, नेपथ्य हिमानी निखाडे, अंशु बुटी यांनी केले. भाजप सांस्कृतिक आघाडीच्यावतीने देण्यात येणारा ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार यंदा मधु जोशी यांना देण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे प्रदेश प्रवक्ता गिरीश व्यास, आ. विकास कुंभारे, देवेन्द्र दस्तुरे, चेतना टांक, प्रकाश लुंगे, संयोजक कुणाल गडेकर, माधवी पांडे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप देवरणकर, नितीन पात्रीकर, मधुरा माने, श्रद्धा घरोटे, अंशु बुटी, केतकी पांडे आदींनी परिश्रम घेतले.