शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

एक झाड ‘ग्रीन अहमदनगर’साठी !

By admin | Updated: June 15, 2016 23:47 IST

अहमदनगर : शहरातील वाढती लोकसंख्या व वाढत्या वाहनांमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. झाडांची संख्या घटल्यामुळे धुळीने व्यापलेले शहर अशी नगरची ओळख बनली आहे.

अहमदनगर : शहरातील वाढती लोकसंख्या व वाढत्या वाहनांमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. झाडांची संख्या घटल्यामुळे धुळीने व्यापलेले शहर अशी नगरची ओळख बनली आहे. यावर मात करत नगरला ‘ग्रीन सिटी’चा दर्जा मिळवून देण्यासाठी ‘लोकमत’ने लोकसहभागातून ‘माय सिटी-माय ट्री’ हे अभियान हाती घेण्याचे ठरविले आहे. नागरिकांना झाडे लावण्याचे व ते जगविण्याचे आवाहन या अभियानात केले जाणार आहे. नगर शहराला सुंदर असा सीनाकाठ लाभला आहे. तसेच नगरची हवाही एकेकाळी प्रदूषणमुक्त मानली जात होती. मात्र, वाढत्या शहराच्या तुलनेत झाडांची संख्या घटल्याने शहराची ही ओळख लयास जाऊ लागली आहे. अशावेळी प्रत्येक नागरिकाने लावलेले एक झाडही या शहराला शुद्ध हवा व सुंदर चेहरा मिळवून देऊ शकते. त्यामुळे ‘लोकमत’ने नगरकरांच्या सहभागातून हे अभियान राबविण्याचे ठरविले आहे. या अभियानात विविध संस्था, संघटना, गणेश मंडळे, तालीम मंडळे, ज्येष्ठ नागरिक, शाळा, महाविद्यालये, औद्योगिक कंपन्या, हॉस्पिटल्स, हॉटेल्स या सर्वांनाच झाडे लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ज्या संस्थांची व नागरिकांची या अभियानात सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी ‘लोकमत’शी संपर्क करावयाचा आहे. त्यांची झाडे लावण्यासाठी मदत घेतली जाणार आहे. यासाठी ‘लोकमत’मध्ये ‘ग्रीन कक्ष’च स्थापन करण्यात आला आहे. या अभियानात संस्था व संघटना झाडे लावण्यासाठी मोकळे मैदान, शाळा, कॉलनी, रस्ते दत्तक घेऊ शकतात. पैसा नको, इच्छाशक्ती हवीएक झाड लावण्यासाठी खड्डा व रोपाचा खर्च मिळून साधारण दीडशे रुपये खर्च येतो. मात्र ‘माय सिटी-माय ट्री’ या मोहिमेत पैसे स्वीकारले जाणार नाहीत. रोख पैशांऐवजी रोपे, ट्री-गार्ड, पोयटा माती, श्रमदान अशी कृतिशील मदत करु शकता. संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये, अपार्टमेंट, कॉलनी, औद्योगिक संस्था, हॉस्पिटल्स, हॉटेल्स यांनी झाडे लावून ती जगविण्याची जबाबदारी स्वीकारल्यास त्यांचा उपक्रम ‘लोकमत’ सर्व जनतेपर्यंत पोहोचवेल. अर्थात झाड मोठे होईपर्यंत या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी या संस्थांवर असेल. अभियानासाठी आपण हे करु शकता?तुमच्या संस्था संघटनेमार्फत स्वत: जागा निवडून झाडे लावू शकता.झाडे लावण्यासाठी जागा सुचवारोपे,पोयटा, पाणी, खत यापैकी तुम्ही काहीही मदत देऊ शकता. झाडांच्या संवर्धनासाठी ट्री-गार्ड दान करु शकता.झाडे लावण्यासाठी तुमच्या संस्था, संघटनेतील किती लोक श्रमदान करु शकतात ते कळवा.