शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

एक रुपयाची नवलाई, विवाह सोहळा शाही ६ जोडप्यांचा सामूहिक विवाह : महाराजे हेमेंद्रसिंह पवार यांची उपस्थिती

By admin | Updated: April 24, 2016 19:01 IST

जळगाव : मराठा उद्योजक विकास मंडळ व क्षत्रिय मराठा महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या एक रुपयात सामूहिक विवाह सोहळ्याची नवलाई रविवारी सागर पार्कवर होती. मध्यप्रदेशातील धार येथील श्रीमंत महाराजे हेमेंद्रसिंह रावजी पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या शाही विवाह सोहळ्यात सहा जोडप्यांनी वैवाहिक जीवनात प्रवेश केला. यावेळी आयोजकांनी वधू-वरांकडून फक्त एक रुपया घेतला व थाटात विवाह सोहळा पार पडला.

जळगाव : मराठा उद्योजक विकास मंडळ व क्षत्रिय मराठा महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या एक रुपयात सामूहिक विवाह सोहळ्याची नवलाई रविवारी सागर पार्कवर होती. मध्यप्रदेशातील धार येथील श्रीमंत महाराजे हेमेंद्रसिंह रावजी पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या शाही विवाह सोहळ्यात सहा जोडप्यांनी वैवाहिक जीवनात प्रवेश केला. यावेळी आयोजकांनी वधू-वरांकडून फक्त एक रुपया घेतला व थाटात विवाह सोहळा पार पडला.
विवाह सोहळ्यास आमदार सुरेश भोळे, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, ज्योती इंगळे, भाजपाचे माजी महानगरप्रमुख अशोक लाडवंजारी, धुळ्याचे माजी महापौर मोहन नवले, रेड स्वास्तिकचे सह महाव्यवस्थापक अशोक शिंदे, उद्योजक कैलास मराठे, अशोक थोरात, प्रवीण नवले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी महाराजे हेमेंद्रसिंह पवार यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता दीपप्रज्वालनाने विवाहसोहळ्याचा शुभारंभ झाला.

सुमारे १५ लाखांची बचत
मंडळाचे विठ्ठलराव मराठे यांनी प्रास्ताविक केले. या सामूहिक विवाह सोहळ्यात सहा जणांचा विवाह झाला. हेच विवाह सोहळे स्वतंत्र झाले असते तर प्रत्येकाला दोन ते अडीच लाख रुपये खर्च आला असता. त्यामुळे १५ ते १६ लाख रुपयांची बचत झाल्याचे त्यांनी सांगितले.

पुढच्या वर्षी ६० विवाह सोहळे व्हावे
आमदार सुरेश भोळे यांनी सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज असल्याचे सांगितले. सहा वरून पुढील वर्षी ६० विवाह करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन आयोजकांना त्यांनी केले.काही जणांना सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करणे हे कमीपणाचे वाटत असते. मात्र सामूहिक विवाह सोहळे हे गोरगरिबांसाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

विधीवत सोहळ्याने गृहस्थाश्रमात प्रवेश
सत्कार समारंभानंतर ब्राšाणांच्या मंत्रोच्चारात आणि विधीवत सहभागी झालेल्या सहा जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी सनईचा मंजूळ सूर कार्यक्रमाची शोभा वाढवित होता. महाराजा हेमेंद्रसिंह रावजी पवार यांच्या सभोवताली विशिष्ट वेशातील कार्यकर्ते होते.

यांचा झाला एक रुपयात सामूहिक विवाह सोहळा
विवाह सोहळ्यात अनिल भालेकर व मोहिनी म्हस्के, शरद महाडिक व मिना जगताप, साहेबराव मराठे व सारीका मांडोळे, श्रीकांत तांबे व दिपाली जाधव, गणेश बजारे व मोनिका डुब्बे, नीलेश मराठे व ज्योती पाटील यांचा विवाह पार पडला. विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या वधू-वरांना संसारपयोगी वस्तू देण्यात आल्या.