शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

वन रँक वन पेन्शन लागू

By admin | Updated: September 6, 2015 05:08 IST

चार दशकांपासून प्रलंबित असलेली ‘वन रँक वन पेन्शन’(ओआरओपी) ही सैनिकांसाठीची निवृत्तिवेतन योजना लागू करण्याची घोषणा अखेर केंद्र सरकारतर्फे शनिवारी करण्यात आली.

नवी दिल्ली : चार दशकांपासून प्रलंबित असलेली ‘वन रँक वन पेन्शन’(ओआरओपी) ही सैनिकांसाठीची निवृत्तिवेतन योजना लागू करण्याची घोषणा अखेर केंद्र सरकारतर्फे शनिवारी करण्यात आली. शिवाय आंदोलनकर्त्यांच्या संरक्षणमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्य मागणी असलेल्या स्वत:हून मुदतपूर्व निवृत्ती घेणाऱ्यांबाबतही सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही मिळाली असल्याने ८४ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. सरकारच्या निर्णयाने सुमारे २६ लाख सेवानिवृत्त सैनिक आणि ६ लाखांवर शहिदांच्या विधवांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ओआरओपी लागू होण्यापूर्वी सेनादलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पेन्शनपोटी सरकार वर्षाकाठी ५४ हजार कोटी रुपये खर्च करीत आहे. त्यात ओआरओपीच्या ८ ते १० हजार कोटींची भर पडेल. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ‘वन रँक वन पेन्शन’ योजना १ जुलै २०१४पासून लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे याअंतर्गत निवृत्तिवेतनाची फेररचना दर पाच वर्षांनी होणार आहे. परंतु माजी सैनिकांनी यासाठी एक वर्षाच्या मुदतीची मागणी केली होती. वन रँक वन पेन्शनच्या अंमलबजावणीसाठी २०१३ हे पायाभूत वर्ष राहील. सायंकाळी संरक्षणमंत्र्यांसोबत आंदोलनकर्त्या माजी सैनिकांची बैठक झाली. त्यात स्वत:हून मुदतपूर्व निवृत्ती घेतल्यानंतरही सैनिकांना पेन्शन देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करणार असल्याची ग्वाही संरक्षणमंत्र्यांनी दिली आहे. यासंबंधी अधिकृत स्पष्टीकरण करण्याची खात्री संरक्षणमंत्र्यांनी दिल्याने आंदोलन सुरू ठेवायचे की नाही याचा निर्णय रविवारी सकाळी कोअर कमिटीच्या बैठकीनंतर घेऊ, असे आंदोलनकर्त्यांचे नेते सेवानिवृत्त मेजर जनरल सतबीरसिंग यांनी बैठकीनंतर सांगितले.योजनेची ठळक वैशिष्ट्ये- वन रँक वन पेन्शनची रिव्हिजन दर पाच वर्षांनी करणार, म्हणजे दर पाच वर्षांनी सैनिकांचे निवृत्तिवेतन वाढणार. - वन रँक वन पेन्शन १ जुलै २०१४पासून लागू होणार. तेव्हापासून आतापर्यंतची थकबाकी चार हप्त्यांत दिली जाईल; तर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना एकाच हप्त्यात थकबाकी मिळेल.- केवळ थकबाकीपोटी सरकारवर जवळपास १० ते १२ हजार कोटी रु पयांचा बोजा पडणार आहे.ं-तांत्रिक व आर्थिक कारणांसाठी हा प्रश्न प्रलंबित होता. आधीच्या सरकारांनी ५०० कोटी रु पयांचा भार पडेल, असे सांगितले. परंतु हा भार प्रत्यक्षात ८ हजार कोटी रु पयांचा आहे आणि तो पुढे वाढेल.- अंमलबजावणीसाठी अंदाजे खर्च ८ ते १० हजार कोटी रुपये - सुमारे २६ लाख सेवानिवृत्त सैनिक आणि ६ लाखांवर शहिदांच्या विधवांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.वन रँक वन पेन्शन हा एक किचकट मुद्दा आहे. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पदांवरून सेवानिवृत्त होणाऱ्या सैनिकांच्या हिताची सखोल पडताळणी करणे गरजेचे आहे. हा केवळ प्रशासकीय मुद्दा नसून सैन्यदलातील अंतर्गत सेवांचाही विचार करावा लागणार आहे. आता वन रँक वन पेन्शनचा प्रश्न निकालात निघाला असल्याने सैनिकांनी पुन्हा देशसेवेमध्ये झोकून द्यावे.- मनोहर पर्रीकर, संरक्षणमंत्रीहा एक ऐतिहासिक निर्णय आहे. नरेंद्र मोदी यांनी २०१४च्या लोकसभा निवडणूक प्रचारात वन रँक वन पेन्शनचे वचन दिले होते. त्यांनी दिलेल्या वचनाची पूर्तता करून दाखविली. - अमित शहा, भाजपाध्यक्षसरकारची घोषणा अत्यंत निराशाजनक आहे. सरकार ओआरओपीच्या मुद्द्याचे राजकारण करीत असून, या योजनेतील मुख्य तरतुदी कमकुवत करण्यात आल्या आहेत.- ए.के. अ‍ॅन्टनी, माजी संरक्षणमंत्री व काँग्रेस नेते