शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना १ लाख क्विंटल बियाणे मोफत एकनाथराव खडसे : पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी दोन हजार कोटींची तरतूद

By admin | Updated: May 16, 2016 00:40 IST

जळगाव : दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांना यावर्षी शासनातर्फे एक लाख क्विंटल बियाणे मोफत देण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी शासनाने दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती कृषी तथा महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी संध्याकाळी ५ वाजता शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना दिली.

जळगाव : दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांना यावर्षी शासनातर्फे एक लाख क्विंटल बियाणे मोफत देण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी शासनाने दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती कृषी तथा महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी संध्याकाळी ५ वाजता शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्यामध्ये बियाण्यांची एकूण गरज ही १४.९९ लाख क्विंटल इतकी आहे. त्यासाठी १७.९० लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. बी.टी.कपाशी लागवडीसाठी १६० लाख पाकिटांची गरज असून त्यासाठी २०० लाख पाकिटे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष
२०१६/१७ हे वर्ष आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष घोषित करण्यात आले आहे. पीक प्रात्याक्षिकासाठी ५४ हजार क्विंटल बियाणे १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर एक लाख ५५ हजार क्विंटल बियाणे वितरणावर ३६ कोटीचे अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. नवीन वाणांचे १.५० लाख क्विंटल बियाणे उत्पादन करण्यासाठी ३६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तुरीची उत्पादकता वाढीसाठी इक्रीसॅट संस्थेच्या पिकाचे संकरीत वाण आयसीपीएच २७४० चे १२०० क्िंवटल बियाणे शेतकर्‍यांना १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तेलबिया पिका अंतर्गत २१००० क्विंटल सोयाबीण बियाणे पीक प्रात्यक्षिकांसाठी १०० टक्के अनुदानावर देण्यात येईल.
राज्यामध्ये खरीप हंगामात रासायनिक खतांचा वापर ३० ते ३२ लाख मे.टन आहे. यावर्षी खरीपासाठी ४० लाख मे.टन रासायनिक खते उपलब्ध आहेत. सद्यस्थितीत ११.८८ लाख मे.टन साठा शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले.
बियाणे, खते व किटकनाशके यासाठी ५७१ उत्पादक असून १.२४ लाख वितरक आहेत. गुणवत्ता नियंत्रणासाठी ३९५ भरारी पथकांची स्थापना केली आहे.
पीक विमा आता सर्व शेतकर्‍यांचा
खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यशासनाने मंजुरी दिली आहे. पिक विम्यासाठी शासनाने दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पूर्वी केवळ कर्जदार शेतकर्‍यांचा पीक विमा काढण्यात येत होता. आता तो सर्व शेतकर्‍यांचा काढण्यात येणार आहे. शेतकर्‍यांना केवळ दोन टक्के दराने विमा हप्ता भरायचा असून उर्वरित हप्त्याची रक्कम केंद्र व राज्य शासन भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.