शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात जात पडताळणीचे एक लाख अर्ज प्रलंबित

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

ग्रामपंचायत निवडणुकामुळे अर्जांची संख्या वाढली

ग्रामपंचायत निवडणुकामुळे अर्जांची संख्या वाढली

पुणे : शासनाने जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी प्रत्येक जिल्‘ासाठी अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु याबाबत अद्यापही अद्यादेश न काढल्याने आज अखेर राज्यातील विविध जात पडताळणी समित्यांकडे विद्यार्थी आणि कर्मचार्‍यांचे तब्बल एक लाख अर्ज प्रलंबित आहेत.
शिक्षण, शासकीय आणि निमशासकीय सेवेत आरक्षित जागांचा लाभ घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असते. या शिवाय आरक्षित जागेवर निवडणूक लढविण्यासाठी देखील जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. यामुळे जात पडताळणी कार्यालयाकडे विद्यार्थी, नोकरदार, राजकीय व्यक्तीचे दररोज हजारो अर्ज येतात. या प्रमाणेच शासनाने कार्यरत असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त भटक्या जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील कमर्चार्‍यांनी ३१ जुलै २०१३ पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास नोकरीतून काढून टाकण्याबाबत शासनाने आदेश काढले होते. यामुळे जात पडताळणी विभागाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. राज्यातील १५ जात पडताळणी समितीपैकी सहा समितीवर अध्यक्ष नाही. तरी गेल्या वर्षभरात जवळपास दोन लाख अर्ज निकाली काढले. आता फक्त शैक्षणिक ४९ हजार १३५ आणि शासकीय नोकरदारांचे ४३ हजार ६०३ आणि इतर ६ हजार असे जवळपास एक लाख अर्ज प्रलंबित आहेत. मात्र शासनाने जात पडताळणी समितीच्या बळकटीकरणाऐवजी समिती रद्द केली आहे. यापुढे जिल्हास्तरावर अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली जात पडताळणीचे काम केले जाणार आहे. पण अद्याप अध्यादेश निघाला नसल्याने जात वैधता प्रमाणपत्रांचे प्रलंबित अर्ज वाढतच आहेत.
याबाबत बार्टीचे महासंचालक डॉ. डी. आर. परिहार यांनी सांगितले की जिल्हास्तरावर समिती स्थापन होण्याचा निर्णय होत नाही. तोपर्यत प्रलंबित दाखले तत्परतेने मार्गी काढण्याचे काम बार्टी करत आहे. गेल्या अठरा महिन्यांपासून समितीचे अध्यक्ष, व सदस्याची पदे रिक्त आहेत. तरी इतर पडताळणी समितीचे अध्यक्ष व सदस्य दिवसरात्र करून प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करत आहेत.
------

चौकट
जात पडताळणी समिती निहाय प्रलंबित अर्ज
मुंबई १२,५६०,पुणे १४,८०२,धुळे १५,२९५,अमरावती समिती-१४,०५१
औरगांबाद ७,३९५, नागपुर ६,६२०, सोलापुर ८२९२, नाशिक ६,५९८ अर्ज प्रलबिंत आहेत.