शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात जात पडताळणीचे एक लाख अर्ज प्रलंबित

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

ग्रामपंचायत निवडणुकामुळे अर्जांची संख्या वाढली

ग्रामपंचायत निवडणुकामुळे अर्जांची संख्या वाढली
पुणे: शासनाने जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिका-यांच्याअध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु याबाबत अद्यापही शासनाने अद्यादेश न काढल्याने आज अखेर राज्यातील विविध जात पडताळणी समित्यांकडे विद्यार्थी आणि कर्मचा-यांचे तब्बल एक लाख अर्ज प्रलंबित आहेत.
शिक्षण, शासकीय आणि निमशासकीय सेवेत आरक्षित जागांचा लाभ घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असते. या शिवाया आरक्षित जागेवर निवडणूक लढविण्यासाठी देखील जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. यामुळे जात पडताळणी कार्यालयाकडे विद्यार्थी, नोकरदार, राजकीय व्यक्तीचे दररोज हजारो अर्ज येतात.याप्रमाणेच शासनाने कार्यरत असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त भटक्या जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील कमर्चा-यांनी ३१ जुलै २०१३ पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास नोकरीतून काढून टाकण्याबाबत शासनाने आदेश काढले होते. यामुळे जात पडताळणी विभागाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. राज्यातील १५ जात पडताळणी समितीपैकी सहा समितीवर अध्यक्ष नाही.तरी गेल्या वर्ष भरात जवळपास दोन लाख अर्ज निकाली काढले.आता फक्त शैक्षणिक ४९ हजार १३५ आणि शासकीय नोकरदारांचे ४३ हजार ६०३ आणी इतर ६ हजार असे जवळपास एक लाख अर्ज प्रलंबित आहेत. मात्र शासनाने जात पडताळणी समितीच्या बळकटीकरणाऐवजी समिती रद्द केली आहे. यापुढे जिल्हास्तरावर अतिरिक्त जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जात पडताळणीचे काम केले जाणार आहे.पण अद्याप अध्यादेश निघाला नसल्याने जात वैधता प्रमाणपत्रांचे प्रलंबित अर्ज वाढतच आहे.
याबाबत बार्टीचे महासंचालक डॉ डी.आर.परिहार यांनी सांगितले की जिल्हास्तरावर समिती स्थापन होण्याचा निर्णय होत नाही.तोपर्यत प्रलबिंत दाखले तत्परते मार्गी काढण्याचा काम बार्टी करत आहे. गेल्या अठरा महिन्यापासून समितीचे अध्यक्ष, व सदस्याची पदे रिक्त आहेत.तरी इतर पडताळणी समितीचे अध्यक्ष व सदस्य दिवस -रात्र करून प्रलबिंत प्रकरणाचा निपटारा करत आहेत.

चौकट:-जात पडताळणी समिती निहाय प्रलबिंत अर्ज
मुंबई १२,५६०,पुणे १४,८०२,धुळे १५,२९५,अमरावती समिती-१४,०५१
औरगांबाद ७,३९५, नागपुर ६,६२०, सोलापुर ८२९२, नाशिक ६,५९८ अर्ज प्रलबिंत आहेत.