शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
3
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
4
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
5
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
6
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
7
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
8
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
9
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
11
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
12
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
13
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
15
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
16
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
17
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
19
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
20
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या

गोवा येथील अपघातात सावंतवाडीतील एक ठार

By admin | Updated: May 12, 2014 21:34 IST

दुचाकी-कार धडक; कारचालक कोल्हापूरचा

दुचाकी-कार धडक; कारचालक कोल्हापूरचा
बांदा : मुंबई-गोवा महामार्गावर तांबोसे (ता. पेडणे, गोवा) येथे दुचाकी व इंडिका कार यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात चराठा-सावंतवाडी येथील मुकादम विलास लक्ष्मण चव्हाण (वय ४५) हे जागीच ठार झाले. आज (सोमवार) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. चव्हाण हे गेली पंचवीस वर्षे सावंतवाडीत मुकादम असून, त्यांच्या निधनाने सावंतवाडीवर शोककळा पसरली आहे.
चव्हाण आपल्या ताब्यातील दुचाकीने (एमएच ०७ आर २१२३) बांद्याहून पेडण्याच्या दिशेने जात होते. याचवेळी पेडण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणार्‍या कारने (एमएच ०९ सीएम २१८९) ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला धडक दिली. या धडकेने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अतिरक्कस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
विलास यांची सेंटिं्रग कामासाठी लागणारी मशीन म्हापसा येथे दुरुस्तीसाठी पाठविण्यात आली होती. तेथे पत्नीला थांबवून मशीनसाठी लागणारे पैसे आणण्यासाठी ते सावंतवाडीत आले होते. पैसे घेऊन ते पुन्हा म्हापसा येथे जात असतानाच हा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडीतील ठेकेदारांनी घटनास्थळी धाव घेतली. पेडणे पोलिसांनी कारचालक बाजीराव गजानन शिंदे (रा. लक्ष्मीपुरी, कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. विलास चव्हाण हे मूळचे बेळगाव सौदती येथील असून, ते गेली २५ वर्षे सावंतवाडी शहरात मुकादमाचा व्यवसाय करीत होते. सुरुवातीच्या काळात त्यांची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. मात्र, हळूहळू त्यांनी आपल्या व्यवसायात जम बसवला होता.
सायंकाळच्या सुमारास विलास चव्हाण यांचा मृतदेह सावंतवाडी वाघाचागुडा येथील निवासस्थानी आणण्यात आला. त्यानंतर मृतदेह सौदत्ती-बेळगाव येथे नेण्यात आला. यावेळी सावंतवाडीतील बरेच सामाजिक तसेच राजकीय, व्यावसायिक मंडळी अंत्यदर्शनासाठी जमले होते.
विलास चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. (प्रतिनिधी)
चौकट १
शुन्यातून विश्व
अपघाती मृत्यूमुखी पडलेले विलास चव्हाण हे पंचवीस वर्षांपूर्वी सावंतवाडीत आले. तेव्हा त्यांच्याजवळ राहण्यासाठी जागाही नव्हती. शहरात अनेक ठिकाणी झोपडीत ते राहत होते. त्यानंतर त्यांनी आपला व्यवसाय वाढवत अलीकडे शहरातच अलिशान बंगला बांधला होता.