रिक्षा अपघातात एक ठार
By admin | Updated: August 10, 2015 00:27 IST
नाशिक : कारला रिक्षाने पाठीमागून दिलेल्या धडकेत रिक्षातील गंभीर जखमी झालेल्या युवकाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़ मयत युवकाचे नाव नितीन रामदास कापसे (२५, रा. बजरंगनगर, आनंदवल्ली) असे आहे. शनिवारी (दि.८) सकाळी ८ वाजेच्या सुमारास अशोकस्तंभाकडे जाणार्या रिक्षामध्ये (एमएच १५ झेड ६५०९) नितीन बसला होता़ रिक्षाचालकाने गंगापूररोडवरील प्रसाद सर्कलजवळ पुढे जाणार्या नॅनो कारला (एमएच १५ ईपी ३७९६) पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेमुळे रिक्षा पलटी झाल्याने नितीनसह इतर प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता रविवारी (दि.९) वाजेच्या सुमारास नितीनचा मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात रिक्षाचालकावर अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)