ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 04 - येथील मधुविहार क्षेत्रात गस्त घालणाऱ्या पोलिसांनी दोन व्यक्तींना अटक करुन त्यांच्याजवळील एक कोटी रुपये जप्त केले. अशोक व रमजानअली अशी आरोपींची नावे असून एका बसमध्ये चढताना त्यांना अटक केली. दोघांजवळ प्रत्येकी ५0 लाख रुपये, दोन हजार नोटेच्या स्वरुपात होते. दोघांनाही आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
दिल्लीत एक कोटी रुपये जप्त
By admin | Updated: February 4, 2017 02:06 IST