विदर्भ-चितळाच्या चामड्यासह एक पाव गांजा जप्त
By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST
चितळाच्या चामड्यासह एक पाव गांजा जप्त
विदर्भ-चितळाच्या चामड्यासह एक पाव गांजा जप्त
चितळाच्या चामड्यासह एक पाव गांजा जप्तअज्ञात आरोपी फरार: निनावी फोनने वनविभागाला माहितीब्रह्मपुरी: स्थानिक कुर्झा येथील एका किराणा दुकानाच्या आवारात चितळाचे चामडे असल्याची माहिती वनविभागाला एका निनावी फोनद्वारे मिळाली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास या ठिकाणी धाड टाकली असता चितळाच्या चमड्यासह एक पाव गांजा निळ्या रंगाच्या बॅगमध्ये ठेवलेला असल्याचे आढळून आले. मात्र अज्ञात आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. कुर्झा वॉर्डातील टेलिफोन एक्स्चेंजसमोर मुख्य मार्गावर अश्विनी किराणा स्टोअर्सच्या आवारात चितळाचे चामडे असल्याची माहिती वनविभागाचे क्षेत्रसहायक एस. बी. मोहुर्ले यांना ८३७९०६८२७८ या निनावी भ्रमणध्वनीवरुन मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे वनविभागाचे कर्मचारी ताफ्यासह कुर्झा रोडवरील मोरेश्वर करंबे यांच्या मालकीच्या अश्विनी किराणा स्टोअर्सजवळ गेले. दुकानाच्या बाहेरील भागात निळ्या गर्द रंगाची स्पोर्ट बॅग आढळून आली. बॅग तपासली असता त्यात चितळाचे चामडे व एक पाव गांजा आढळून आला. वनविभागाने पंचनामा करून चामडे व गांजा जप्त केला. घटनास्थळावर वनविभागाचे कर्मचारी पोहोचण्यापूर्वी घटनास्थळावरून एक युवक व युवती चेहऱ्याला दुपट्टा बांधलेल्या अवस्थेत दुचाकीने ब्रह्मपुरीकडे गेल्याचे करंबे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.वनाधिकाऱ्यांनी दुकानाचे मालक मोरेश्वर करंबे यांचे बयाण घेतले असता ते म्हणाले, वनविभागाला आलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावरून आपणालाही आठवडाभरापासून फोन येत होते. परंतु समोरील व्यक्ती बोलत नव्हती. त्याच क्रमांकाच्या भ्रमणध्वनीवरून वनविभागाला सदर प्रकरणाची माहिती देऊन आपल्या वैऱ्याने सुनियोजित कट रचून आपणाला फसविण्याचा प्रयत्न केला. वनाधिकारी पुढील चौकशी करीत आहेत.ही कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी ए. जी. साळवे, क्षेत्रसहायक एस. बी. मोहुर्ले, सहाय्यक वनसंरक्षक जी. एम. नन्नावरे, वनरक्षक वैद्य, बुरडकर, शेंदूरकर, व्याहाडकर आदींनी केली. (तालुका प्रतिनिधी)