शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजाराचा व्यवहार,बक्षीस मिळाले कोटीचे

By admin | Updated: April 10, 2017 01:02 IST

नोटाबंदीनंतर लोकांना रोखरहित डिजिटल व्यवहार प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सुरु केलेल्या बक्षिस योजनेचे एक

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर लोकांना रोखरहित डिजिटल व्यवहार प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सुरु केलेल्या बक्षिस योजनेचे एक कोटी  रुपयांचे बंपर बक्षिस रविवारी सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या ग्राहकास जाहीर झाले. या ग्राहकाने रुपे डेबिट कार्ड वापरून १,५९० रुपयांचा व्यवहार केला होता.सरकारने ग्राहकांसाठी भाग्यवंत ग्राहक योजना व व्यापाऱ्यांसाठी डिजी धन व्यापार योजना अशा दोन योजना सुरु केल्या होत्या. या दोन्ही योजनांची बंपर बक्षिसांची सोडत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते काढण्यात आली.या सोडतीत राष्ट्रपतींनी या दोन्ही योजनांचे प्रत्येकी तीन विजेते ठरविण्यासाठी चिठ्ठ्या काढल्या. येत्या १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीस नागपूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण केले जाईल. भाग्यवंत ग्राहक योजनेचे एक कोटी रुपयांचे पहिले बक्षिस सेंट्रल बँकेच्या, ५० लाख रुपयांचे दुसरे बक्षिस बँक आॅफ इंडियाच्या ग्राहकास तर २५ लाख रुपयांचे तिसरे बक्षिस पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकास मिळाले. या तिन्ही ग्राहकांनी रुपे डेबिट कार्ड वापरून रोखरहित व्यवहार केले होते. ही सोडत काढण्यासाठी फक्त व्यवहार क्रमांक घेण्यात आल्याने या विजेत्या ग्राहकांची नावे लगेच कळू शकली नाहीत. व्यवहार क्रमांकांची कार्ड क्रमांकाशी जुळणी करून ग्राहकांची नेमकी ओळख स्पष्ट होईल.पारदर्शी चळवळ...डिजिटल व्यवहारांची संस्कृती रुजविण्यासाठी सरकारने उचललेले हे धाडसी पाऊल प्रशंसनीय आहे. समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिकांनी यात सक्रियपणे सहभागी होऊन ही चळवळ यशस्वी करायला हवी. पारदर्शी व्यवहारांसाठी हे गरजेचे आहे.-प्रणव मुखर्जी, राष्ट्रपती