शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा एक्झिट पोलची फजिती

By admin | Updated: March 12, 2017 01:06 IST

प्रत्यक्ष मतदान केलेल्या मतदारांचा कल जाणून शास्त्रोक्त पद्धतीने घेतली जाणारी मतदानोत्तर चाचणी (एक्झिट पोल) विदेशात अतिशय विश्वासार्ह समजली जात

- प्रेमदास राठोड

प्रत्यक्ष मतदान केलेल्या मतदारांचा कल जाणून शास्त्रोक्त पद्धतीने घेतली जाणारी मतदानोत्तर चाचणी (एक्झिट पोल) विदेशात अतिशय विश्वासार्ह समजली जात असताना भारतात मात्र एक्झिट पोलची केवळ फजितीच बघावयास मिळत आहे. आज आलेले पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि एक्झिट पोलचे अंदाज यात कुठेही ताळमेळ बसत नाही. गेल्या दोन दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले एक्झिट पोलचे अंदाज आजच्या निकालानंतर पूर्णत: फोल ठरले आहेत.मतदानापूर्वी वेळोवेळी केलेल्या सर्वेक्षणाचे अंदाज अनेकदा प्रत्यक्ष निकालाच्या कसोटीवर उतरतीलच याचा नेम नसतो. पण एकदा मतदान झाल्यानंतर मतदारांचा जाणून घेतलेला कल म्हणजे एक्झिट पोल प्रत्यक्ष निकालाच्या जवळपास जाणारे हवेत. एक्झिट पोलचे अंदाज आणि प्रत्यक्ष निकाल यात फारतर ५ टक्के तफावत असायला हवी. आजच्या निकालानंतर मात्र एक्झिट पोलचे अंदाज धड ५ टक्केही खरे ठरलेले नाहीत.भाजपाच्या झोळीत आले भरपूरउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या घवघवीत यशामुळे इतर पक्षांची पार झोपमोड झाली आहे. या राज्यात एक्झिट पोल घेतलेल्या संस्थांपैकी ‘इंडिया टुडे’ने भाजपाला २७९ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला होता. इतर संस्थांनी १५५ ते २१०पेक्षा जास्त जागा भाजपाला दिल्या नव्हत्या. येथील मतदारांनी मात्र भाजपाच्या झोळीत तब्बल ३१२ जागा दिल्या. येथे सपा, बसपा व इतर पक्षांबाबतचे एक्झिट पोलचे अंदाजही साफ आपटले. सत्ताधारी समाजवादी पार्टी - काँग्रेस आघाडीला ८८ ते १६९ जागा मिळतील हा एक्झिट पोलचा अंदाज खोटा ठरला. या आघाडीला येथे फक्त ५४ जागांवर समाधान मानावे लागले. बसपाच्या सुमार कामगिरीने तर एक्झिट पोलची फजिती केली आहे. सर्व संस्थांच्या एक्झिट पोलने बसपाला २८पेक्षा जास्त व कमाल ९३ जागा मिळतील, असा दावा केला होता. प्रत्यक्षात बसपाला फक्त १९ जागा मिळाल्या. उर्वरित लहान लहान अर्थात इतर पक्षांबाबतचे एक्झिट पोलचे अंदाजही नापास ठरले.विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह मणिपुरात एक्झिट पोलचे अंदाज चुकले. ‘इंडिया टुडे अ‍ॅक्सिस’चे अंदाज निकालाच्या जवळपास जाणारे होते. या संस्थेने भाजपाला १६ ते २२ जागा मिळतील, असे म्हटले होते. भाजपाला येथे २१ जागा मिळाल्या. इंडिया टीव्ही सी-व्होटरने येथे काँग्रेसला किमान १७ जागा दिल्या होत्या तर इंडिया टुडे एक्झिट पोलने ३०पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात येथे काँग्रेसला २८ जागा मिळाल्या. प्रत्यक्ष मतदान केलेल्या मतदारांचा कल जाणून केलेले एक्झिट पोलचे अंदाज, त्याच मतदारांनी दिलेल्या कौलाने खोटे ठरल्यामुळे एक्झिट पोलच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे. ‘आप’विषयीचे निष्कर्ष फसलेपंजाबातही एक्झिट पोलचे अंदाज निकालाच्या जवळपासही फिरकू शकले नाहीत. सत्ताधारी अकाली दल-भाजपा आघाडीला ४ ते १३ जागा मिळतील, असा अंदाज होता. पण प्रत्यक्षात या आघाडीला १८ जागा मिळाल्या. काँग्रेसबाबतचे फक्त ‘इंडिया टुडे अ‍ॅक्सिस’चे अंदाज निकालाच्या जवळपास जाणारे ठरले. इंडिया टुडेच्या एक्झिट पोलने काँग्रेसला येथे जास्तीतजास्त ७१ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला होता. येथे काँग्रेसला प्रत्यक्षात ६ जागा जास्त म्हणजेच ७७ जागा मिळाल्या. पंजाब विधानसभेत २० आमदारांसह हजेरी लावण्यात यशस्वी ठरलेल्या आम आदमी पार्टीला तर सर्व एक्झिट पोलने हरभऱ्याच्या झाडावर नेऊन ठेवले होते. पुढील सरकार आम आदमी पार्टीचेच असा दावा करणारे सर्व एक्झिट पोल येथील मतदारांनी फेल ठरवले. येथे आपला ४२ ते ६७ जागा मिळतील, असा एक्झिट पोलचा अंदाज होता. प्रत्यक्ष फक्त २० जागा मिळाल्या. गोव्यातही खाल्ला सपाटून मारगोव्यात तर सत्ताधारी भाजपासोबतच एक्झिट पोलही सपाटून आपटले. येथे एक्झिट पोल घेतलेल्या एकाही संस्था भाजपाला १५पेक्षा कमी आणि काँग्रेसला १८पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नव्हत्या. प्रत्यक्ष निकालानंतर या लहानशा विधानसभेत सत्ताधारी भाजपा जेमतेम १३ जागांपर्यंत मजल मारू शकली. काँग्रेसने मात्र सर्वांचे अंदाज चुकवून १७ जागा पटकावल्या. गोव्यातही आम आदमी पार्टीचा उदोउदो करण्यात एक्झिट पोल घेणाऱ्या संस्थांमध्ये स्पर्धा लागली होती. येथील अंदाजात संख्येमध्ये शून्य ते २, ४, ७ असे नमूद केल्यामुळे एक्झिट पोलची थोडीफार विश्वासार्हता राहिली. गोव्यात सरकार स्थापणारच असा प्रण घेऊन कामाला लागलेल्या ‘आप’ला भोपळाही फोडता आला नाही. मतदारांनी ठरवले एक्झिट पोल खोटेउत्तराखंडातही एक्झिट पोलचे सर्व अंदाज मतदारांनी खोटे सिद्ध केले. येथे भाजपाला एकाही एक्झिट पोलने ५३पेक्षा जास्त जागा दिल्या नव्हत्या. प्रत्यक्षात येथे भाजपाने ५७ जागा पटकावून शानदार विजय मिळवला. काँग्रेसच्या कामगिरीने येथे एक्झिट पोलची खूप निराशा केली. सत्ताधारी काँग्रेसला येथे फक्त ११ जागांवर समाधान मानावे लागले.