शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकरांच्या सर्जिकल स्ट्राईकबद्दलच्या खुलाश्यावर उमर अब्दुल्ला यांची टीका

By admin | Updated: July 1, 2017 16:21 IST

पर्रीकरांनी केलेल्या या खुलाशावर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी टीका केली आहे.

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 1-  पाकिस्तानमध्ये घुसून करण्यात आलेला सर्जिकल स्ट्राईक हे एका न्यूज चॅनेलच्या अँकरने विचारलेल्या अपमानजक प्रश्नाचं उत्तर होतं, असा खुलासा माजी केंद्रीय संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला. पर्रीकरांनी केलेल्या या खुलाशावर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी टीका केली आहे. 
 
"न्यूज चॅनेलच्या अँकरने अपमानजनक प्रश्न विचारला म्हणून सर्जिकल स्ट्राईकची आखणी करण्यात आली, याला काय म्हणायचं ! न्यूज अँकरच्या याच प्रश्नामुळे भारत आणि पाकिस्तान दरम्यान अधिक मोठा संघर्ष पेटला असता. तरीही असले निर्णय करणाऱ्यांच्या हाती आपण सुरक्षित असल्याची भावना आपण जोपासणं अपेक्षित आहे!, असं ट्विट जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केलं आहे.  
 
"अशा प्रकारच्या निर्णया घेण्याच्या प्रक्रियेमुळे आपण सुरक्षित आहोत का?, असा सवालही उमर अब्दुला यांनी विचारला आहे. 
 
"भारतीय लष्कराने थेट म्यानमारमध्ये घुसून केलेल्या कारवाईनंतर एका टीव्ही अँकरने केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांना अपमानजनक सवाल विचारला होता. हा माझ्यासाठी एक अपमान होता. यामुळेच पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घसून सर्जिकल स्ट्राईक करण्याची योजना आखली", असं मनोहर पर्रीकर बोलले आहेत. 
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यवसायिकांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, "मी नोव्हेंबर 2014 मध्ये जेव्हा संरक्षणमंत्री म्हणून पदभार स्विकारला तेव्हा संरक्षण मंत्रालय पुर्णपणे ढासळलेलं होतं. पुर्णपणे गोंधळाचं वातावरण होतं. याचवेळी मनोहर पर्रीकरांनी भारत-म्यानमार सीमारेषा आणि भारत-पाकिस्तान सीमेवर करण्यात आलेल्या सर्जिंकल स्ट्राईकसंबंधी माहिती दिली. कशाप्रकारे या सर्जिंकल स्ट्राईकचं प्लानिंग करण्यात आलं हेदेखील त्यांनी सांगितलं. पर्रीकर यांनी सांगितलं की, "जेव्हा मला मणिपूरमध्ये 6 डोग्रा रेजिमेंटवर हल्ला झाल्याची आणि त्यात 18 जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली तेव्हा ते मला खूप अपमानजक वाटलं. माझ्यासाठी तो वैयक्तिक अपमान होता". "नॅशनल सोशलिस्ट काऊन्सिल ऑफ नागालँडसारख्या छोट्या दहशतवादी संघटनेकडून इतक्या भारतीय जवानांचा मृत्यू होणं हा माझ्यासाठी अपमानच होता", असं पर्रीकर यांनी सांगितलं.  यानंतर 8 जून रोजी भारतीय लष्कराने थेट म्यानमारमध्ये घुसून आपल्या जवानांच्या हत्येचा बदला घेत अतिरेक्यांचा खात्मा केला होता. 
 
आणखी वाचा :
 

 

सर्जिकल स्ट्राईक एका न्यूज अँकरच्या अपमानाचं उत्तर होतं - मनोहर पर्रीकर

 
 
 
"आम्ही कोणतीही माहिती दिली नसताना ही बातमी लीक झाली होती. मात्र एका प्रश्नाने माझा अपमान झाला. केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड एका कार्यक्रमात कशाप्रकारे सर्जिकल स्ट्राईक करण्यात येतो याची माहिती सांगत होते. यावेळी न्यूज अॅकरने त्यांनी तुम्ही हिच हिंमत वेस्टर्न फ्रंटवर दाखवणार का ? असा सवाल विचारला. एक यशस्वी सर्जिंकल स्ट्राईक केल्यानंतर हा माझ्यासाठी अजून एक अपमान होता. मात्र मी ते शांतपणे ऐकून घेतलं, आणि वेळ आल्यावर याचं उत्तर द्यायचं ठरवलं", असं मनोहर पर्रीकरांनी सांगितलं. 
 
पाकिस्तानमध्ये घुसून करण्यात आलेल्या सर्जिंकल स्ट्राईकसाठी 15 महिन्यांपासून तयारी सुरु होती. 29 सप्टेंबर 2016 रोजी करण्यात आलेल्या सर्जिंकल स्ट्राईकसाठी 9 जूनपासून म्हणजे 15 महिने आधीच तयारी सुरु झाली होती असा खुलासा मनोहर पर्रीकरांनी केला आहे.