शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना ओम बिर्लांच्या शिस्तीचा प्रत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 02:06 IST

प्रश्नोत्तराच्या तासाला हा प्रकार घडला. पुरवणी प्रश्न विचारून खाली बसलेल्या हेमंत गोडसे यांना दानवेंनी पुन्हा प्रश्न विचारण्याची विनंती केली. त्यावर ओम बिर्ला नाराज झाले.

नवी दिल्ली : लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या शिस्तीची प्रत्यय केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि एकदा लोकसभा सदस्यांना मंगळवारी आला. पुन्हा प्रश्न विचारण्याची विनंती रावसाहेब दानवे यांनी खासदारास केल्याने ओम बिर्ला यांनी, ‘सन्माननीय मंत्री, प्रश्नांकडे लक्ष द्या. काळजीपूर्वक ऐका’, असे ऐकविले. त्यामुळे प्रश्न विचारणाऱ्या हेमंत गोडसे यांनाही क्षणभर काय झाले हे समजले नाही.प्रश्नोत्तराच्या तासाला हा प्रकार घडला. पुरवणी प्रश्न विचारून खाली बसलेल्या हेमंत गोडसे यांना दानवेंनी पुन्हा प्रश्न विचारण्याची विनंती केली. त्यावर ओम बिर्ला नाराज झाले. दानवेंना सांगितल्यावर बिर्लांनी मोर्चा गोडसेंकडे वळवला. मी तुम्हाला आणखी एक संधी देतो, पण पुन्हा तोच प्रश्न विचारू नका, असे त्यांनी गोडसेंना सांगितले.झालेला प्रकार अरविंद सावंत यांनी हेमंत गोडसेंना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर, मिस्टर सावंत, कृपया त्यांन सांगा, असे बिर्ला म्हणाले. गोडसेंच्या दुसºया प्रश्नाला मात्र सार्वजनिक वितरण केंद्रीय मंत्री रामविलास पासवान उत्तर देण्यास उभे राहिले.पासवान यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तशाही स्थितीत ते उभे राहून उत्तर देत होते. बिर्ला यांनी त्यांनाही, आवश्यकता वाटल्यास खाली बसून बोला, अशी सूचना केली.पासवान यांनी मात्र उभे राहूनच उत्तरे दिली. ते पाहून बिर्ला म्हणाले, मी तुम्हाला पुन्हा सांगतो. तुम्ही खाली बसूनही बोलू शकता. (उभे राहिल्याने) तुमचे दुखणे वाढेल! बिर्ला त्यांच्या शिस्तीमुळेओळखले जातात.एकदा पुरवणी प्रश्न विचारण्यासाठी नाव पुकारल्यावर सदस्य सभागृहात नसल्याचे आढळले. त्यावरून बिर्लांनी नाराजी व्यक्त केली होती. यापुढे असे घडल्यास संपूर्ण अधिवेशनात संबधित खासदारास पुरवणीप्रश्न विचारू देणार नाही, असे काही दिवसांपूर्वी त्यांनी सुनावले होते.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवे