शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तेलबिया, कडधान्यावर आयात शुल्क वाढविणार, आठवडाभरात अधिसूचना निघणार, हमीभाव मिळण्यासाठी मंत्रिगटामध्ये चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 03:12 IST

- विकास झाडेनवी दिल्ली : आयात शुल्क वाढवायचे, निर्यातीला परवानगी द्यायची आणि काही गोष्टींवर निर्बंध आणले तरच तेलबिया आणि कडधान्यास किमान हमीभाव मिळेल यावर आज मंत्रीगटाने निर्णय घेतला असून येत्या आठवडाभरात याला मूर्त रूप येणार आहे.केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत श्रमशक्ती भवनात पार पडलेल्या मंत्रीगटाच्या बैठकीत कडधान्य आणि ...

- विकास झाडेनवी दिल्ली : आयात शुल्क वाढवायचे, निर्यातीला परवानगी द्यायची आणि काही गोष्टींवर निर्बंध आणले तरच तेलबिया आणि कडधान्यास किमान हमीभाव मिळेल यावर आज मंत्रीगटाने निर्णय घेतला असून येत्या आठवडाभरात याला मूर्त रूप येणार आहे.केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत श्रमशक्ती भवनात पार पडलेल्या मंत्रीगटाच्या बैठकीत कडधान्य आणि तेलबियांवर विस्तृत चर्चा झाली. या बैठकीत कृषीमंत्री राधामोहन सिंग, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान, कॅबिनेट सचिव पी.के. सिन्हा, संबंधीत खात्याचे सर्व सचिव उपस्थित होते.देशभरात तेलबिया आणि कडधान्यास हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. यामुळे काही ठिकाणी शेतकºयांच्या आत्महत्या होत असल्याची चर्चा या बैठकीत झाली. सोयाबिन, भुईमुग, उडीद, तूरडाळीला हमी भावापेक्षा अधिक किंमत कशी मिळवून देता येईल यावरही सदस्यांनी आपले मत मांडले. पाम तेलावरील आयात शुल्क हे २५ टक्क्यांवरून ४५ टक्क्यांवर वाढविण्यात यावे असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.येत्या आठवड्यातच यावर अधिसूचना काढली जाईल अशी माहिती सुत्राने दिली.महाराष्ट्रात हमीभावाची समस्या अधिकपाशा पटेल म्हणाले, खुल्या बाजारपेठेत हमी भावापेक्षा अधिक दर शेतकºयांना मिळू शकेल, सरकारला त्यासाठी शेतकºयांच्या व्यथांकडे बारकाईने लक्ष घालावे लागेल. आपण त्यासाठीच दिल्लीत दाखल झाला आहोत.तेलबिया व डाळ उत्पादन करणाºया महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजराथ व राजस्थानात हमी भावाबाबत समस्या निर्माण झाली आहे. या बैठकीत खासदार संजयकाका पाटील सहभागी झाले होते.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स