शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महागाईच्या आगीत तेल!

By admin | Updated: July 5, 2014 08:46 IST

अच्छे दिन येणार! असे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने महागाईच्या आगीत तेल ओतण्याची तयारी चालविली आहे

नवी दिल्ली : अच्छे दिन येणार! असे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने महागाईच्या आगीत तेल ओतण्याची तयारी चालविली आहे. स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रति सिलिंडर २५० रुपये आणि रेशनवरील केरोसिनचे दर प्रति लिटर ४ रुपयाने वाढविण्याच्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशींना पाठबळ देणारा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाकडून सादर केला जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या राजकीय कामकाजविषयक समितीपुढे (सीसीपीए) हा प्रस्ताव सादर होईल.पेट्रोलियम मंत्रालय डिझेल, केरोसिन आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची दरवाढ करण्याच्या संदर्भात सीसीपीएचा मसुदा तयार करीत आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. याआधीच्या संपुआ सरकारने लोकांना सहन होईल अशा बेताने डिझेलच्या दरात महिन्याकाठी फक्त ४० ते ५० पैसे वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारला सध्या प्रति लिटर डिझेल विक्रीवर ३.४० रुपयांचे नुकसान होत आहे. हे नुकसान भरून निघेपर्यंत ही मासिक दरवाढ चालू ठेवण्याचा पेट्रोलियम मंत्रालयाचा विचार असल्याचे कळते.सीसीपीएने पेट्रोलप्रमाणे डिझेलची दरवाढही नियंत्रणमुक्त करण्याची अनुमती द्यावी, अशी पेट्रोलियम मंत्रालयाची इच्छा आहे. २०१०मध्ये पेट्रोलचे दर सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यात आले होते. त्यामुळे दर महिन्याच्या १ आणि १६ तारखेला पेट्रोलच्या किमतीची समीक्षा केली जाते. या पार्श्वभूमीवर सीसीपीएने योजना आयोगाचे माजी सदस्य किरीट एस. पारिख यांच्या अध्यक्षतेखालील विशेषज्ज्ञ समितीच्या शिफारशींचा विचार व्हावा, यासाठी पेट्रोलिअम मंत्रालयाकडून रेटा लावला जाईल, असे दिसते. (लोकमत न्यूज नेटवर्क)