शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! त्याने बारावीच्या पेपरात लिहिली पॉर्नकथा

By admin | Updated: June 8, 2017 18:52 IST

गुजरातमधील एका विद्यार्थ्याने 12वीच्या केमेस्ट्रीच्या पेपरात लिहिलेली भलतीच केमेस्ट्री वाचून

ऑनलाइन लोकमत 
अहमदाबाद, दि. 8 - पास होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत देवाचे नाव, मंत्र किंवा पेपर तपासणाऱ्या शिक्षकाला पास करण्यासाठी विनंती करणारे पत्र लिहिल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. पेपर तपासणारे शिक्षकही विद्यार्थ्यांनी  लिहिलेल्या हटके उत्तरांच्या गमतीजमती सांगत असतात. पण गुजरातमधील एका विद्यार्थ्याने 12वीच्या केमेस्ट्रीच्या  पेपरात जे काही लिहिले ते वाचून पेपर तपारणाऱ्या शिक्षिकेला  440 व्होल्टचा धक्काच बसला.  
गुजरातमधील 12वीच्या केमेस्ट्रीच्या पेपरात एका विद्यार्थ्याने  प्रश्नांची उत्तरे म्हणून विविध विषयांवरच्या पॉर्नकथा लिहिल्या. हा पेपर तपारण्यासाठी जेव्हा एका महिला शिक्षिकेकडे गेला तेव्हा केमेस्ट्रीच्या पेपरात लिहिलेली भलतीच केमेस्ट्री वाचून तिला धक्का बसला. तिने या प्रकाराची तक्रार वरिष्ठांकडे केली. त्यानंतर या विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
पेपरात पॉर्नकथा लिहिणाऱ्या या अवली विद्यार्थ्याला परीक्षा रिफॉर्म्स समितीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र तो हजर राहिला नाही. या प्रकाराबाबत गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे चेअरमन ए.जे. शहा यांनी सांगितले की," या विद्यार्थ्याचा निकाल रद्द करण्यात आला असून,  त्याच्यावर परीक्षा देण्यास एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे." 
परीक्षा मंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या विद्यार्थ्याने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर म्हणून स्वत:च्या विविध व्यक्तिसोबतच्या पॉर्नकथा लिहिल्या होत्या. विशेष बाब म्हणजे या विद्यार्थ्याला केमेस्ट्रीमध्ये भोपळा मिळालाच पण इतर विषयांतही तो नापास झाला.