शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकारी गायब, सदस्य हैराण

By admin | Updated: December 14, 2015 19:34 IST

विकासकामे खोळंबल्याचा आरोप : सीईओ अडकले फाईलीत

विकासकामे खोळंबल्याचा आरोप : सीईओ अडकले फाईलीतनाशिक : गेल्या काही दिवसांपासून पदाधिकारी जिल्हा परिषदेकडे फिरेनासे झाल्याने जिल्हा परिषद सदस्य हैराण झाले असून, पदाधिकारी भेटत नसल्याने विकासकामे खोळंबल्याचा आरोप सदस्यांमधून करण्यात येत आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारीही नवीनच असल्याने ते नस्तींचा (फाईलींचा)अभ्यास करण्यात गुंतल्याचाही आरोप सदस्यांमधून करण्यात येत आहे.सोमवार व मंगळवार मुख्यालयात पदाधिकारी व अधिकारी यांनी थांबावे, अभ्यागतांना वेळ देऊन त्यांची कामे करावीत, असा अलिखित नियमच आहे. काल (दि.१४) जिल्हा परिषदेत एकही पदाधिकारी नसल्याने ग्रामीण भागातून आलेल्या सदस्यांचा वेळ व पैसा वाया गेल्याचा आरोप काही सदस्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. गेल्या काही महिन्यांपासून विकासकामे होत नसून केवळ फाईलींचा प्रवास लांबत असल्याचा आरोपही आता करण्यात येत आहे. दलितवस्ती सुधार योजनेच्या ३५ कोटींचेही अद्याप नियोजन झालेले नाही. तसेच ग्रामपंचायतींकडून दहा टक्के लोकवर्गणीही घेऊनही तीन कोटींच्या सौर पथदीपांची खरेदी होऊ शकलेली नाही. जिल्हा परिषद सेस व जिल्हा नियोजन मंडळाकडून प्राप्त झालेल्या निधीचेही अद्याप नियोजन झालेले नसल्याचे बोलले जाते. अधिकारीही सोमवार आणि मंगळवार मुख्यालयात थांबत नसल्याने सदस्यांची कामे रखडत असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. प्रशासनावर नियंत्रण तरी कोणाचे आणि सदस्यांच्या मतदारसंघातील विकासकामे कधी मार्गी लागणार, अशी चर्चा आता जिल्हा परिषद सदस्यांमध्ये सुरू झाली आहे. नवीन बदलून आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनीही प्रत्येक फाईलीचा अभ्यास करूनच नंतर निर्णय घेण्याची पद्धत अवलंबली असली तरी त्यामुळे किरकोळ कामांनाही आठवडा उलटत असल्याचा आरोेप सदस्यांकडून करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)नियमित आढावाआपण दर मंगळवारी खातेप्रमुखांचा नियमित आढावा घेऊन जिल्हा परिषदेच्या योजना व कामांबाबत आढावा घेतो. सेसच्या निधीचे नियोजन होऊन कामांची देयकेही सादर होत आहे. दलितवस्ती सुधार योजनेत नियमानुसार फेर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकार्‍यांना देण्यात आलेले आहेत. आपण दररोज जिल्हा परिषदेत नियमित हजर असते. कोणती विकासकामे खोळंबली त्याची यादी दिली तर प्रस्ताव मार्गी लावू.- विजयश्री चुंबळे, अध्यक्ष, जिल्हा परिषद