किरायाच्या जागेत अडकले दुय्यम निबंधक कार्यालय
By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST
(फोटो)
किरायाच्या जागेत अडकले दुय्यम निबंधक कार्यालय
(फोटो)किरायाच्या जागेत अडकले दुय्यम निबंधक कार्यालयरामटेक येथील प्रकार : कोंदट वातावरणामुळे कर्मचाऱ्यांसह नागरिक त्रस्तदीपक गिरधर ० रामटेक रामटेक तहसील कार्यालयाच्या इमारतीत सुसज्ज कक्ष उपलब्ध असताना दुय्यम निबंधक कार्यालयाचा कारभार मात्र वर्षभरापासून किरायाच्या इमारतीतून सुरू आहे. या इमारतीतील कोंदट वातावरणामुळे येथील कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त येणारे चांगलेच त्रस्त झाले आहे. तहसील कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या कार्यालयाचा दुय्यम निबंधकांनी ताबा घेतला असून, त्यांच्या कक्षावर तसा फलकही लावला आहे. हे कार्यालय तहसील कार्यालयापासून दीड कि.मी.वर आहे. नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामामुळे शासकीय कार्यालये इतरत्र हलविण्यात आली होती. तहसील कार्यालयाचे लोकार्पण होऊन वर्ष पूर्ण झाले. या काळात बहुतांश कार्यालये नवीन इमारतीत स्थानांतरित करण्यात आली. तहसील कार्यालय इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील काही खोल्या दुय्यम निबंधक कार्यालयासाठी राखून ठेवण्यात आल्या. दुय्यम निबंधकांच्या फलकाशिवाय तिथे काहीही दिसून येत नाही. या संदर्भात उपविभागीय अधिकारी राम जोशी यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की, नवीन इमारतीतील कक्षाचा ताबा तत्कालीन दुय्यम निबंधक पंत यांनी स्वीकारला. त्यांचे कार्यालय येथे स्थानांतरित करण्यात आले नाही. नवीन कक्ष सुसज्ज आहे. या इमारतीत पुरेचे विजेचे पॉईंट नाहीत. त्यासाठी ३० हजार रुपयांचा खर्च करावा लागणार आहे, अशी माहिती दुय्यम निबंधक विजय निलावार यांनी दिली.