शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST
शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध गुन्हानागपूर : दुचाकीवर फॅन्सी नंबर लावलेल्यांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा करूनही ते न थांबल्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. त्यानंतर आरोपींनी पोलिसांना शिविगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. अंकीत राजू चौधरी (२१) आणि राजू द्वारकाप्रसाद चौधरी (५०) रा. मिडल रिंग रोड, इस्ट वर्धमाननगर हे आपल्या दुचाकीला फॅन्सी नंबर प्लेट लावून चालले होते. त्यांना इमामवाडामधील पोलीस सोनाली डामु येलके (३३) यांनी थांबण्याचा इशारा केला. परंतु ते वेगात पळून जात होते. त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्यावर आरोपींनी शिविगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.