शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

आॅक्टोबर हीट, त्यात पायपीट

By admin | Updated: October 10, 2014 03:04 IST

मतदानाचा दिवस जवळ येऊन ठेपलेला असताना निवडणुकीचा रंगही चढलेला दिसून येत आहे. कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास उमेदवार अनेक शक्कल लढवत आहेत.

मनीषा म्हात्रे, मुंबईमतदानाचा दिवस जवळ येऊन ठेपलेला असताना निवडणुकीचा रंगही चढलेला दिसून येत आहे. कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास उमेदवार अनेक शक्कल लढवत आहेत. मात्र आॅक्टोबर हीटमुळे उमेदवारांपुढे डोंगराळ भागातील पायपीट त्रासदायक ठरत असल्याचे चित्र आहे. त्यातही बहुतांश डोंगराळ भाग असलेल्या उत्तर पूर्व मुंबईमधील मतदारसंघातील उमेदवारांना याची जास्त झळ बसत आहे. उत्तर पूर्व मुंबईमध्ये मुलुंड ते घाटकोपर या भागातील ४० टक्के मतदार हा डोंगराळ परिसरात राहतो. हा मतदार विकासापासून मोठ्या प्रमाणात वंचित आहे. उदाहणार्थ मुलुंडमधील न्यू राहुल नगर, हनुमान पाडा, शंकर टेकडी, उदय नगर, पंंचशील नगर, भांडुप टेभीपाडा, रमाबाई नगर, विक्रोळी पार्कसाइट, फुले नगर-घाटकोपर, असल्फा व्हिलेज अशा अनेक भागांमध्ये अनेक निवडणुका आल्या आणि गेल्याही, परंतु विकासाची गंगा मात्र काही पोहोचलीच नाही. इथला मतदार अजूनही दुर्लक्षितच आहे. वीज- पाण्यासारख्या मूलभूत सुविधांपासूनही अनेक कुटुंबे वंचित आहेत. यंदाच्या पंचरंगी लढतीत मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मतविभागणीमुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू आहे. एरवी डोंगराळ भागाच्या उंचवट्यावर राहणाऱ्या मतदारांकडे ढुंकूनही न बघणारे राजकीय नेते सध्या या भागात धापा टाकत पायपीट करताना दिसत आहेत. त्यामुळे उमेदवारांसाठी उन्हाच्या उकाड्यात डोंगराळ भागातील प्रचार सर्वात जास्त त्रासदायक ठरत आहे. त्यातच त्यांचा जास्त वेळ जात असल्याचे दिसते. बहुतेक उमेदवार सायंकाळच्या वेळेत या ठिकाणी प्रचार करण्यावर भर देताना दिसत आहे. मात्र, उमेदवाराने कितीही पायपीट केली, तरी जो आमच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिल त्यालाच आम्ही मतदान करणार असल्याचे डोंगराळ भागात राहणाऱ्या मतदारांचे म्हणणे आहे.