शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

जुन्या गोव्यात भाविकांचा महासागर

By admin | Updated: December 4, 2014 02:42 IST

जुने गोवे येथील जगप्रसिद्ध सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त बुधवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने साजरे झाले.

पणजी : जुने गोवे येथील जगप्रसिद्ध सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त बुधवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने साजरे झाले. पवित्र शवप्रदर्शन आणि फेस्त असा योगायोग आल्याने भाविकांची जुने गोवेकडे रिघ लागली होती.मुंबईचे आर्चबिशप गोमंतकीय सुपुत्र कार्डिनल आॅसवल्ड ग्राशियस यांनी सकाळी १०.३० वाजता मुख्य प्रार्थनेच्यावेळी भाविकांना संबोधताना शांती, सलोख्याचा संदेश दिला. सर्वांच्या हृदयात सदाकाळ भावार्थ राहो, सर्वधर्म समभाव कायम राहो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव, पोप यांचे माजी राजदूत बाल्सको कुलासो, गोव्याचे माजी आर्चबिशप राहुल गोन्साल्विस, पोर्तुगालचे बिशप कार्लुस आझावेदो आणि जुझे आल्फ्रेड, सिंधुदुर्गचे बिशप आॅल्विन बार्रेटो उपस्थित होते. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शिकवणीनुसार प्रत्येकाने प्रेम आणि एकात्मतेने स्वत:चे जीवन फुलवावे. गरीब, गरजवंतांना मदत करा, असे आवाहन आर्चबिशप आॅसवल्ड यांनी केले. पहाटे चार ते सकाळी नऊ वाजेपर्यंत तासातासाने प्रार्थना सुरू होत्या. सकाळी १०.३० वाजता मुख्य प्रार्थना झाली. आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव यांच्या हस्ते सेंट जोझेफ वाझ यांच्या जीवनावर आधारित ‘डिव्हाइन बॉण्डेज’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. सें कॅथेड्रल चर्चमध्ये पवित्र शवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. (प्रतिनिधी)