शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

प्रसंगी काँग्रेसचा ‘आप’ला पाठिंबा

By admin | Updated: January 9, 2015 02:06 IST

दिल्लीत त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यास आम आदमी पार्टीला(आप) पुन्हा पाठिंबा देण्याची काँग्रेसची तयारी असेल, असे माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : दिल्लीत त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यास आम आदमी पार्टीला(आप) पुन्हा पाठिंबा देण्याची काँग्रेसची तयारी असेल, असे माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी स्पष्ट केले.आम्हाला स्थिर सरकार हवे असून गरज भासल्यास जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आमची ‘आप’ला पाठिंबा देण्याची तयारी असेल, असे त्या म्हणाल्या. दुसरीकडे कॉंग्रेसने दीक्षित यांच्या विधानाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. दीक्षित यांचे ते वैयक्तिक मत असू शकते, असे दिल्ली प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते मुकेश शर्मा यांनी स्पष्ट केले.आपसोबत युती करण्याची काँग्रेसची इच्छा आहे काय, असे दीक्षित यांना विचारण्यात आले असता त्यांनी तशी शक्यता फेटाळून लावली. दरम्यान आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी दीक्षित यांच्या विधानाची टर उडविली.दिल्लीतील ७० जागांपैकी एकही जागा काँग्रेसला मिळेल अशी अपेक्षा नाही. आम्हाला स्वबळावर सत्तेवर येण्याचा विश्वास आहे, असे ते म्हणाले. पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता पाहता राजकीय पक्षांनी दिल्लीत प्रचाराला सुरुवात केली आहे. पाठिंबा ना देऊ ना घेऊआम्ही कधीही आम आदमी पार्टीला पाठिंबा देणार किंवा घेणार नाही. केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेची फसवणूक केली आहे. ही जनता त्यांना पुन्हा संधी देणार नाही. या निवडणुकीत काँग्रेसला विजयाचा विश्वास आहे, असे मुकेश शर्मा यांनी म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)२०१३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ८ जागा मिळाल्याने १५ वर्षांपासूनची राजवट संपुष्टात आली होती. अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अल्पमतातील सरकार स्थापन केले होते.