शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
2
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
3
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
5
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
6
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
7
म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं?
8
देशातील परिस्थितीवर आलिया भटची इतक्या दिवसांनी पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक वर्दीच्या मागे..."
9
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
10
गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
11
कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...
12
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
13
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
14
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
15
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
16
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
17
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
18
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
19
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
20
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट

अधिकाऱ्यांच्या तपासासाठी लोकपालांची मंजुरी बंधनकारक ? सरकारवर टीका : हा तर भ्रष्टाचाराला संरक्षण देण्याचा प्रयत्न

By admin | Updated: February 18, 2015 23:53 IST

नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास करण्यासाठी सीबीआय किंवा अन्य तपास संस्थांना लोकपालांची पूर्वमंजुरी बंधनकारक करण्याबाबत सरकार विचार करीत आहे. भ्रष्टाचाराला संरक्षण देण्याचा हा प्रयत्न मानत कायदेतज्ज्ञांनी टीका केली असली तरी सरकारने त्यामागे कर्मचाऱ्यांच्या कामकाजात पारदर्शकता आणण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास करण्यासाठी सीबीआय किंवा अन्य तपास संस्थांना लोकपालांची पूर्वमंजुरी बंधनकारक करण्याबाबत सरकार विचार करीत आहे. भ्रष्टाचाराला संरक्षण देण्याचा हा प्रयत्न मानत कायदेतज्ज्ञांनी टीका केली असली तरी सरकारने त्यामागे कर्मचाऱ्यांच्या कामकाजात पारदर्शकता आणण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले आहे.
भादंविच्या कलम १९७ तसेच दिल्ली विशेष पोलीस कायद्याच्या कलम ६ ए किंवा भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १९ नुसार लोकपालांना खटल्याची परवानगी देण्याचे अधिकार आहेत. लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यातही तशी तरतूद आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत केंद्रात लोकपालांची तर राज्यात लोकायुक्तांच्या परवानगीची गरज आहे. दिल्ली विशेष पोलीस स्थापना कायद्याच्या कलम ६ ए नुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कोणत्याही गुन्ह्याच्या तपासासाठी केंद्र सरकारची परवानगी बंधनकारक असून सीआरपीसी आणि पीसी कायद्यातही तशी तरतूद आहे.
----------------
सवार्ेच्च न्यायालय काय म्हणते?
सवार्ेच्च न्यायालयाने गेल्यावर्षी संयुक्त सचिव किंवा त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत सीबीआयला सक्षम प्राधिकरणाकडून परवानगी घेणे बंधनकारक करण्याची तरतूद अवैध आणि बेकायदा असल्याचे सांगतानाच त्यामागे भ्रष्टाचाराला संरक्षण देण्याचा उद्देश राहू शकतो, असे स्पष्ट केले होते.
----------------------
कोट
कोणत्या दर्जाच्या कर्मचाऱ्याबाबत भेदभाव करण्याची सरकारची इच्छा नाही. आम्हाला सौहार्द्र वातावरणात कर्मचाऱ्यांच्या कामाची परिणामकारकता आणि पारदर्शकता वाढवायची आहे.
-जितेंद्रसिंग
केंद्रीय कार्मिक मंत्री
---------------------
लोकपालांची नियुक्ती कधी?
अद्याप लोकपाल मंडळाची नियुक्ती व्हायची आहे. लोकापालासंबंधी सुधारित विधेयकाचा संसदीय समिती अभ्यास करीत आहे. लोकपाल आणि लोकायुक्त सुधारित विधेयक ८ डिसेंबर १४ रोजी लोकसभेत सादर करण्यात आले. राज्यसभा सदस्य ई.एम.सुदर्शन नाचिप्पन यांच्या नेतृत्वातील कार्मिक- तक्रार निवारण, कायदा आणि न्याय संसदीय समितीकडे हे विधेयक सोपविण्यात आले आहे.
---------------
कायद्याशी विसंगत ठरणार
संयुक्त सचिव किंवा त्यावरील अधिकाऱ्यांवर खटला भरण्यासाठी कलम ६ ए तसेच दिल्ली विशेष पोलीस कायद्यानुसार असलेली पूर्वपरवानगीची तरतूद सवार्ेच्च न्यायालयाने एका आदेशाद्वारे हटविली असून सरकारचे प्रयत्न त्याच्याशी विसंगत ठरतात,असे सवार्ेच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील जी. वेंकटेश राव यांनी स्पष्ट केले.
पूर्वपरवानगी घेण्याचे चांगले-वाईट असे दोन्ही परिणाम शक्य आहे. सीबीआय ही स्वतंत्र तपास संस्था असल्याने पूर्ण मोकळीक द्यायला हवी. एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला पकडायचे झाल्यास पूर्वपरवानगीच्या अटीमुळे दीर्घकाळ लागू शकतो. त्यामुळे केवळ नोकरशाहीत वाढ होईल. एखाद्या कर्मचाऱ्यावर कारवाई केल्यानंतर त्याबाबत लोकपालांना माहिती दिली जावी, असेही ते म्हणाले.