शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र बँकेचे ७ कोटी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पत्रपरिषद : क्षेत्रीय व्यवस्थापक दिलीप मोंढे यांची माहिती

By admin | Updated: September 17, 2015 00:31 IST

लातूर : बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेच्या ८१ व्या व्यवस्थापन दिनाच्या निमित्ताने बँकेच्या वतीने प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा एक भाग म्हणून लातूर झोन अंतर्गत २५०० ग्राहकांना ७०० कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट निश्चित केल्याची माहिती क्षेत्रीय व्यवस्थापक दिलीप मोंढे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.

लातूर : बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेच्या ८१ व्या व्यवस्थापन दिनाच्या निमित्ताने बँकेच्या वतीने प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा एक भाग म्हणून लातूर झोन अंतर्गत २५०० ग्राहकांना ७०० कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट निश्चित केल्याची माहिती क्षेत्रीय व्यवस्थापक दिलीप मोंढे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. बँक ऑफ महाराष्ट्रचा १६ सप्टेंबर स्थापना दिवस असल्याने बँकेच्या वाटचालीला ८१ वर्षे पूर्ण झाली असून, या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत पुणे येथील केंद्रीय कार्यालयात मुद्रा कार्ड वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सर्व बँकांच्या कार्यक्षेत्रात ग्राहक सभा व विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मुद्रा योजना ही तीन भागांत विभागली असून, शिशु, किशोर आणि तरुण अशी याची विभागणी केली आहे. ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या वित्तीय समावेशाची ही पुढची पायरी आहे. शिशु योजनेअंतर्गत छोट्या व्यावसायिकांना ५० हजारपर्यंतचे कॅश क्रेडिट व मुदत कर्ज योजना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर किशोर मुद्रा योजनेनुसार ५ लाख रुपयांपर्यंतचे मुदत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तरुण मुद्रा योजनेअंतर्गत १० लाख कॅश क्रेडिट व मुदत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पंतप्रधान यांच्या जन-धन योजनेचा पुढचा टप्पा म्हणून या योजनेकडे बघण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना मुद्रा कार्ड दिले जाणार असून, त्यांच्या कर्जाचा व्याज दर हा बेस रेट एवढा असणार आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना सदरील कर्जासाठी कोणतेही तारण द्यावे लागणार नाही. हे सर्व कर्ज विना तारण दिले जाणार आहे. १६ ते २५ सप्टेंबरपर्यंत मुद्रा लाभार्थींचे सर्व्हेक्षण करून त्यांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २५ सप्टेंबरनंतर ते २ ऑक्टोबर या कालावधीत आलेल्या अर्जातील लाभार्थ्यांना कर्ज वितरीत केले जाणार आहे. यावेळी पत्रपरिषदेस उपक्षेत्रीय व्यवस्थापक उदय कुर्वलकर यांची उपस्थिती होती. २५०० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट... बँक ऑफ महाराष्ट्रच्या लातूर झोन अंतर्गत पाच जिल्‘ांतील २५०० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, २५०० लाभार्थ्यांना ७ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले जाणार आहे. या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन क्षेत्रीय व्यवस्थापक दिलीप मोंढे यांनी केले आहे.