शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
5
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
6
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
7
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
8
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
9
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
10
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
11
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
12
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
13
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
14
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
15
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
16
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
17
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
18
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
19
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
20
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...

ओबामांच्या सुरक्षेत माकडांची बाधा सुरक्षा अधिकाऱ्यांना चिंता : बेवारस कुत्र्यांनाही रोखायचे कसे?

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

नितीन अग्रवाल

नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या दिल्लीतील आगमनाच्यावेळी विविध स्तरीय सुरक्षा कडे तयार करण्यात आले असले तरी दिल्लीतील माकडे आणि बेवारस कुत्रे मोठा अडसर ठरू शकतात. ओबामा ज्या मौर्य शेरटेन हॉटेलमध्ये थांबणार आहेत त्या हॉटेलजवळ जंगलाचा परिसर असून माकडांच्या झुंडीच्या झुंडी दिवसभर धुमाकूळ घालत असतात. तसेच लुटियन झोन आणि रायसीना हिल या भागातही माकडांची दहशत ही काही नवी बाब नाही. सरकारी आकड्यांनुसार सुमारे साडेतीन लाख बेवारस कुत्र्यांचे वास्तव्य दिल्लीतील रस्त्यांवरच असते. या कुत्र्यांच्या त्रासामुळे गेल्या वर्षभरात २८ हजार बेवारस कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव डीएम सपोलिया यांनी वन, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला कामाला लावत भटक्या जनावरांच्या बंदोबस्तासाठी कृती योजना तयार करण्याचा आदेश दिला आहे.
--------------------
लंगूरचा आवाज काढण्यासाठी
माणसे लागली कामी
ओबामा ज्या मौर्य शेरटेन होटल येथे थांबतील त्या जवळील जंगलांत गेल्या अनेक वर्षांपासून माकडांची दहशत आहे. नवी दिल्ली महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार या माकडांना उत्पातापासून व त्यांच्या या दहशतीपासून दूर ठेवण्यासाठी वन विभागाचे सहकार्य घेण्यात येते.
या माकडांना पळविण्यासाठी लंगूर जातीच्या माकडांचा आवाज काढण्यासाठी
अनेकांना काम देण्यात आले आहे. असे लुटियन झोनमध्ये सुमारे ४० जण कामाला लागले आहेत.