शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रावर नोंदलेल्या एकमेव मताचीही मोजणी

By admin | Updated: May 15, 2014 04:18 IST

एखाद्या मतदान यंत्रावर केवळ एकाच मतदाराचे मत नोंदले गेले असले तरी त्याचीही स्वतंत्रपणे नोंदणी केली जावी, असे निवडणूक आयोगाने निवडणूक अधिकार्‍यांना कळविले आहे.

नवी दिल्ली: निवडणुकीत मतदान यंत्रावर नोंदल्या गेलेल्या प्रत्येक मताची मोजणी करणे कायद्याने सक्तीचे असल्याने काही कारणास्तव एखाद्या मतदान यंत्रावर केवळ एकाच मतदाराचे मत नोंदले गेले असले तरी त्याचीही स्वतंत्रपणे नोंदणी केली जावी, असे निवडणूक आयोगाने निवडणूक अधिकार्‍यांना कळविले आहे. एखाद्या मतदान केंद्रावर केवळ एकच मतदार असल्यामुळे किंवा अनेक मतदार असले तरी त्यापैकी फक्त एकानेच मतदान केले म्हणून किंवा आधी वापरल्या जात असलेल्या मतदान यंत्राची क्षमता संपल्यावर नवे यंत्र सुरु केल्यावर त्यावर केवळ एकाच मतदाराने मतदान केल्यामुळे मतदान यंत्रावर एकमेव मताची नोंदणी होण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. प्रत्येक मतदान यंत्रावर नोंदलेल्या मतांची स्वतंत्रपणे मोजणी केली जाते. त्यामुळे ज्या यंत्रावर एकमेव मत नोंदविले गेले आहे त्या मताची वेगळेपणाने मोजणी केली तर त्या मतदाराने कोणाला मत दिले आहे हे साहजिकच उघड होऊन मतदानाच्या गुप्ततेची भंग होईल. त्यामुळे अशा परिस्थितीत काय करावे, अशी व्चारणा काही मतदारसंघांतील निवडणूक अधिकार्‍यांनी विचारल्यानंतर आयोगाने वरीलप्रमाणे खुलासा केला आहे. यावर आयोगाचे म्हणणे असे की, नोंदले गेलेल्या प्रत्येक मताची मोजणी करणे सक्तीचे असल्याने एखाद्या यंत्रावर एकमेव मत नोंदले गेले असले तरी त्याची मोजणी करण्यावाचून अन्य पर्याय नाही. याआधीही असे केले गेलेले आहे. या एकमेव मताची स्वतंत्रपणे मोजणी केल्याने मतदानाच्या गुप्ततेचा भंग होईलच असे नाही, पण तसे होण्याची शक्यता मात्र आहे. त्या एकमेव मतदाराने मतदान केले तेव्हा मतदान केंद्रावर हजर असलेला एखादा मतदान एजन्टच मतमोजणीच्या वेळी एजन्ट असेल तरच तो एकमेव मतदार कोण व त्याने कोणाला मत दिले याबात गुप्तता न पाळली जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.निवडणूक कर्मचार्‍यांकडून मताची गुप्तता राकण्याची पुरेपूर काळजी घेतली जाते, असे आयोगाने स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)