शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधींहून एनटीआर महान

By admin | Updated: January 19, 2017 04:57 IST

महात्मा गांधी यांच्यापेक्षा एन.टी. रामाराव (एनटीआर) यांनी तेलुगू लोकांसाठी अधिक काम केले

विजयवाडा : महात्मा गांधी यांच्यापेक्षा एन.टी. रामाराव (एनटीआर) यांनी तेलुगू लोकांसाठी अधिक काम केले, असे विधान करून तेलुगू देसम पक्षाच्या खासदाराने नव्या वादाला तोंड फोडले आहे. मचावरम गावातील एसआरआर अ‍ॅण्ड सीव्हीआर कॉलेजमध्ये तेलुगू देसमचे संस्थापक एन.टी. रामाराव यांचा पुतळा उभारण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना विजयवाडाचे खासदार केसिनेनी श्रीनिवास यांनी हे वादग्रस्त विधान केले. एनटीआर हे काही महात्मा गांधी नाहीत, असे सांगून काही लोकांनी त्यांचा पुतळा उभारण्यास विरोध केला होता. त्याला उत्तर देताना श्रीनिवास म्हणाले की, एनटीआर गांधींपेक्षा कमी नव्हते. किंबहुना त्यांनी तेलुगू जनतेसाठी गांधींहून अधिक काम केले. विरोधी पक्षाशी संबंधित विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते निदर्शने करीत असूनही एनटीआर यांच्या २१ व्या पुण्यतिथीनिमित्त कॉलेजच्या आवारात त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. घोषणाबाजीद्वारे सोहळ्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही निदर्शकांना पोलिसांनी अटक केली, तर इतरांना कॉलेजच्या परिसरातून बाहेर काढले. >अडथळा नाहीपुतळा उभारण्यास एसएफआय, एआयएसएफ, एनएसयूआय आणि इतर विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतला होता. तथापि, एनटीआर या कॉलेजचे माजी विद्यार्थी असल्याच्या आधारे तेलुगू देसमच्या नेत्यांनी पुतळा उभारण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते. कॉलेज व्यवस्थापन आणि माजी विद्यार्थ्यांनी हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले होते. एनटीआर यांचा पुतळा रस्त्यावर उभारला नसून, त्यामुळे वाहतुकीला अडथळाही होत नाही. त्यामुळे कोणाला आक्षेप घ्यायचे काही कारण नाही, असे श्रीनिवास म्हणाले.