शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘अच्छे दिन’ म्हणताच लोक हसतात-राहुल गांधी

By admin | Updated: November 23, 2015 23:46 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करीत त्यांच्यावर उपरोधिक टीका केली.

सहारनपूर (उ.प्र.) : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करीत त्यांच्यावर उपरोधिक टीका केली. आता ‘अच्छे दिन’ म्हणताच, लोक हसायला लागतात, असे ते म्हणाले. मोदींच्या विदेशवारीवरही त्यांनी हल्ला चढवला.उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी राहुल यांनी संवाद साधत पदयात्रा काढली. त्यांच्या पदयात्रेत शेकडो लोक सहभागी झाले. यावेळी ठिकठिकाणी थांबत त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी मोदींवर सडकून टीका केली. पंतप्रधान विदेश दौरे करण्यात व्यस्त आहेत. कधी इंग्लंडला, कधी मलेशियाला, तर कधी अमेरिकेला त्यांचे दौरे सुरू असतात. मोदी विदेशवाऱ्यांसाठी उड्डाण भरत असताना हा राहुल गांधी मात्र तुमच्या शेतात तुमच्यासोबत उभा आहे, असे ते म्हणाले. मोदींनी ‘अच्छे दिन’चा नारा दिला होता. भारत बदलून दाखवेल, असे ते म्हणाले होते. पण आता मोदींना स्वत:लाही ‘अच्छे दिन’चा नारा आठवत नाही. (वृत्तसंस्था)