शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आता तेल कारखाने रडारवर?

By admin | Updated: October 19, 2016 04:56 IST

भारताच्या तेल कारखान्याच्या अधिकाऱ्यांकडून पाकिस्तानचा हेर माहिती मिळवताना आढळल्यानंतर देशातील तेल कारखान्यांना पाकिस्तानने आपले लक्ष्य केल्याचे दिसते.

नवी दिल्ली : भारताच्या तेल कारखान्याच्या अधिकाऱ्यांकडून पाकिस्तानचा हेर माहिती मिळवताना आढळल्यानंतर देशातील तेल कारखान्यांना पाकिस्तानने आपले लक्ष्य केल्याचे दिसते. या तेल कारखान्यांची सुरक्षा वाढवा आणि माहिती सुरक्षित ठेवा, असा सल्ला गुप्तचर विभागाने (आयबी) तेल मंत्रालयाला दिला आहे. पाकिस्तानी हेर तेल कारख्यान्याच्या कार्यकारी अधिकाऱ्याकडून माहिती घेत असल्याचे संभाषण आयबीने पकडल्यानंतर हा सल्ला देण्यात आला आहे. काश्मीरमधील उरी येथे लष्करी तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी छावण्यांवर लक्ष्यभेदी कारवाया केल्या. यानंतर दोन्ही बाजुंकडून सीमा भागांत संघर्ष वाढण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर संस्था आणि संरक्षण दले अतिसावध झाली आहेत. आयबीने नुकतेच एक संभाषण पकडले. त्यात पाकिस्तानी हेर स्वत:ला भारताच्या परराष्ट्र गुप्तचर संस्थेचा (रॉ) अधिकारी असल्याचे सांगून राजस्थानमधील संवेदनशील अशा हायड्रोकार्बन पाईपलाईनचे व्यवस्थापन बघणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी फोनवर बोलत होता. संभाषणात त्याने त्या पाईपलाईनचे महत्वाचे व संवेदनशील तपशील मिळवले, असे या विषयाशी थेट संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले. आयबीने अनेक पाकिस्तानी हेर सीमेपलीकडून तसेच भारतातूनही तेल कारख्यान्यांचा तपशील मिळवण्यासाठी तेल कारखान्यांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना फोन करीत आहेत, असा इशारा दिला आहे. तेल मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी गृह मंत्रालयाकडे असून ते योग्य ती कार्यवाही करील. इंडियन आॅईल कार्पोरेशनच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की उत्तर भारतातील तेल शुद्धीकरण कारखान्यांच्या अधिकाऱ्यांना व सुरक्षा कर्मचाऱ्यांना आम्ही परिस्थितीचे गांभीर्य सांगितले आहे. तेल शुद्धीकरण कारख्यान्याची पाईपलाईन उडवून देण्यामुळे किंवा तिची हानी केल्यामुळे काही विभागांत तेलाच्या टंचाईचा दीर्घ काळचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. शिवाय जीवित हानी व पायाभूत सुविधांचेही नुकसान होऊ शकते, असेही सांगण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)