नवी दिल्ली : आपल्या संपत्तीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी भारतीय रेल्वे आता उच्च शक्तीच्या सेन्सरवर आधारित असलेली उपकरणे खरेदी करणार आहे. रेल्वे रूळ आणि रोलिंग स्टॉकमध्ये असलेले दोष हुडकून काढणारे रेल्वेने खरेदी केलेले हे पहिलेच सेन्सरआधारित उपकरण असेल. सेन्सरआधारित या उपकरणांकडे एक प्रकारे निगराणीप्रणाली म्हणूनच पाहिले जात आहे. ही प्रणाली रेल्वे रूळ, प्रवासी डबे, मालवाहू वाघिणी व इंजिनची निगराणी करेल. त्यात काही बिघाड वा दोष आढळून आल्यास नियंत्रण कक्षाला वेळीच माहिली देईल.
अपघात टाळण्यासाठी आता रेल्वेचे नवे उपकरण
By admin | Updated: August 30, 2015 22:10 IST