शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

अब की बार मोदी का नंबर, दहशतवाद्यांनी भरकोर्टात दिली धमकी

By admin | Updated: May 18, 2014 16:55 IST

भोपाळ येथे पोलिसांच्या अटकेत असलेल्या सिमी संघटनेच्या दहशतवाद्यांनी न्यायालयाच्या आवारातच 'अब की बार मोदी का नंबर' अशी घोषणाबाजी करत मोदींना ठार मारण्याची धमकीच दिली.

ऑनलाइन टीम

भोपाळ, दि. १८ -  नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होणार असतानाच भोपाळ येथे पोलिसांच्या अटकेत असलेल्या सिमी संघटनेच्या दहशतवाद्यांनी न्यायालयाच्या आवारातच 'अब की बार मोदी का नंबर' अशी घोषणाबाजी करत मोदींना ठार मारण्याची धमकीच दिली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत मध्यप्रदेश पोलिसांनी या दहशतवाद्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
मध्यप्रदेश पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी सिमी या प्रतिबंधित संघटनेच्या १५ दहशतवाद्यांना अटक केली होती. या दहशतवाद्यांचे  इंडियन मुजाहिदीनशी या दहशतवादी संघटनेशी संपर्क असल्याचा पोलिस तपासात उघड झाले आहे. शनिवारी दुपारी या दहशतवाद्यांना भोपाळमधील कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. सुनावणीनंतर पोलिस या दहशतवाद्यांना घेऊन परतत होते. गाडीत बसताना यातील अबू फैजल या दहशतवाद्याने मोदींविरोधात घोषणाबाजीच सुरु केली. 'अब की बार मोदी का नंबर', दुनिया की एक ही ताकत अल्ला है, तालिबान आयेगा और मोदी जायेगा' अशी घोषणा बाजी सुरु केली. या घोषणाबाजीने कोर्टाच्या परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी त्या सर्व दहशतवाद्यांना गाडीत बसवून केंद्रीय कारागृहाच्या दिशेने निघून गेले. कोर्टाच्या आवारातच मोदींना धमकी दिल्याने कोर्टाच्या परिसरात खळबळ माजली होती. 
दरम्यान, या घटनेनंतर मध्यप्रदेशमधील अतिरिक्त पोलिस महासंचालक (गुप्तवार्ता विभाग) सरबजीत सिंह यांनी संबंधीत दहशतवाद्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे. लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी या दहशतवाद्यांनी जाणूनबुजून ही घोषणाबाजी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही घटना आम्ही गंभीरतेने घेतली असून यापुढे या दहशतवाद्यांची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्याचे प्रयत्न सुरु आहेत असे त्यांनी सांगितले.