शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

प्राप्तिकर विभागाची आता खरेदीवरही नजर

By admin | Updated: May 17, 2017 01:39 IST

एखाद्या व्यक्तीने जर महागडी वस्तू खरेदी केली किंवा मोठी गुंतवणूक केली आणि ही खरेदी त्याच्या उत्पन्नाशी मिळतीजुळती नसेल तर आयकर विभाग अशा प्रकरणात तपास

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : एखाद्या व्यक्तीने जर महागडी वस्तू खरेदी केली किंवा मोठी गुंतवणूक केली आणि ही खरेदी त्याच्या उत्पन्नाशी मिळतीजुळती नसेल तर आयकर विभाग अशा प्रकरणात तपास करणार आहे. मात्र, ही खरेदी उत्पन्नाशी मिळतीजुळती असेल तर चौकशी होणार नाही. त्यामुळे खरेदी करतानाही सावध राहावे लागणार आहे. आयकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, केवळ मोठे ट्रान्झॅक्शन असल्यामुळे एखाद्याची चौकशी होणार नाही. तर, चौकशीसाठी अधिकाऱ्याकडे खास कारण असायला हवे. जेव्हा तपास करणे गरजेचे आहे अशा वेळीच तपास केला जाईल. सेंट्रल बोर्ड आॅफ डायरेक्ट टॅक्सेसच्या (सीबीडीटी) गत आठवड्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तपासासाठी आवश्यक असलेल्या अटींची समीक्षा करण्यासाठी ही बैठक बोलविण्यात आली होती. या तपासात विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिकचे ट्रान्झॅक्शन कॉम्युटरवर आधारित प्रणालीवर घेतले जातात. नियमित कर भरणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास होऊ नये हा यामागचा उद्देश आहे. ज्या संस्थांमध्ये चुकीचे काम सुरु आहे तिथे अधिक लक्ष केंद्रीत करण्याचाही प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे. हा विभाग डेटा जमविण्यासाठी ज्या स्त्रोतांचा उपयोग करतो त्यात दुसऱ्या देशांच्या टॅक्स अ‍ॅथोरिटीज आणि भारतातील मोठे व्यवहार यांचाही समावेश आहे. कर चोरीच्या प्रयत्नांचा शोध लावण्यात येणार- ‘आॅपरेशन क्लिन मनी’अंतर्गत काही नागरिकांची ओळख निश्चित करण्यात आली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकात जमा करण्यात आलेली मोठी रक्कम आणि मोठे व्यवहार याबाबत समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांचीही चौकशी होऊ शकते. - या विभागाने मोठ्या प्रमाणात डेटा एकत्र केला आहे. यातून कर चोरीच्या प्रयत्नांचा शोध लावण्यात येणार आहे. अशा प्रकरणात ६० हजार नागरिकांची ओळख निश्चित करण्यात आली आहे. त्यांचा आता तपास करण्यात येणार आहे.