शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आता नेताजींनीच पक्षाची धुरा सांभाळावी - शिवपाल यादव

By admin | Updated: October 24, 2016 11:58 IST

मुलायम सिंह यादव यांच्यामुळे समाजवादी पक्ष आज या उंचीवर पोहोचला असून त्यांनी पुन्हा पक्षाची धुरा सांभाळावी, असे शिवपाल यादव यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २४ - समाजवादी पक्ष मोठा करण्यासाठी मी नेताजींसोबत काम केले आहे, आता नेताजींनीच पक्षाची धुरा पुन्हा सांभाळावी, असे मत व्यक्त करत समाजावादी पक्षाच प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी अखिलेश यादव यांना पुन्हा विरोध दर्शवला आहे.  समाजवादी पक्षात सुरू असलेला कौटुंबिक सत्तासंघर्ष आता शिगेला पोहोचला असून या संघर्षाचे केंद्रबिंदू असलेले  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रविवारी  काका शिवपाल यादव यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला. यावरूनच उत्तर प्रदेशातील वातावरण तापले असून हा गृहकलह अधिक तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर लखनऊमध्ये समाजवादी पक्षाच्या मुख्यालयातील बैठक आयोजित करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी अखिलेशविरोधातील नाराजी स्पष्टपणे दर्शवली. 
(समाजवादी पक्षातंर्गत 'यादवी', अखिलेश-शिवपाल समर्थक भिडले)
(उत्तर प्रदेशमध्ये 'यादवी' : रामगोपाल यादवांची सपामधून हकालपट्टी)
(मुलायम यांच्याकडे जाणार मुख्यमंत्रिपद ?)
(अखिलेश यांनी शिवपालना मंत्रिपदावरून हटवले, अन्य तीन मंत्र्यांनाही घरचा रस्ता)
 
' मुलायमसिंह यादव यांच्यामुळेच पक्ष आज या उंचीवर पोहोचला आहे, पक्षात बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही' अशा शब्दांत त्यांनी अखिलेशना फटकारले. ' तसेच अखिलेश यांनीच नवा पक्ष काढून निवडणूक लढवण्याची भाषा केली होती' असा आरोपही त्यांनी केला. तसेच ' पक्षात खोटारड्यांना बिलकूल जागा नाही' असे सांगत शिवपाल यांनी अखिलेश यांच्यावर टीका केली.
 
 काय म्हणाले शिवपाल यादव : 
१) समाजवादी पक्षाला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेताजींसोबत काम केले आहे, खूप संघर्ष केला. गावागावात जाऊन आम्ही नेताजींची पत्र पोहोचवली, खूप मेहनत केली आम्ही. 
२) नेताजीं आणि मुख्यमंत्र्यांच्या सर्व आदेशांचे मी  पालन केले. कोणती आज्ञा आम्ही मानली नाही ते तुम्हीच सांगा. 
३) माझ्याकडून सर्व विभाग काढून घेण्यात आले.  सरकारमध्ये माझं काहीच योगदान नाही का? 
४) मी नेताजींच्या आदेशावरून प्रदेशाध्यक्ष बनलो होतो,  पण माझ्याकडे पद आल्यावर माझ्यासोबत काय झाले? मी मुख्यमंत्र्यापेक्षा कमी काम केलं का?
5) अखिलेशनेच दुसरा पक्ष स्थापून निवडणूक लढवण्याची भाषा केली होती. मी शपथ घेऊन सांगतो, त्यांनीच दुसरा पक्ष काढण्याचा उच्चार केला होता. 
६) जमीनीवर कोणाचा कब्जा नसेल, भ्रष्टाचार संपेल तेव्हाच आपण २०१७ साली सरकार स्थापन करू शकू. 
७) रामगोपालची दलाली चालू देणार नाही.