शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आता फक्त 2500 रुपयांत विमान उड्डाण

By admin | Updated: April 27, 2017 11:50 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 2500 रुपयांमध्ये दिल्ली ते शिमला या विमान प्रवासाला हिरवा कंदील दाखवला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 27 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 2500 रुपयांमध्ये दिल्ली ते शिमला या विमान प्रवासाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानंतर आता कडप्पा ते हैदराबाद आणि नांदेड-हैदराबाद अशा उड्डाण सेवांनाही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे छोट्या छोट्या शहरांमधील पर्यटन केंद्रही आता विमान प्रवासानं जोडली जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या योजनेचा शुभारंभ हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या शिमलातून केला आहे. छोट्या शहरांना हवाई मार्गाने जोडण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी योजनेचा हा एक भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारताकडे हायड्रो पॉवर मोठ्या प्रमाणात असून, जगात भारताचा वेगानं विकास होतोय. देशाच्या एकतेसाठी हवाई सेवा गरजेची आहे. छोट्या शहरांना जोडण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या विमान सेवेमुळे गुंतवणूक वाढणार असून, विमान प्रवासात आता चप्पल घालणारे लोकही पाहायला मिळतील. तरुणांना संधी दिल्यास देशाचा चेहरा बदलेल. हवाई संपर्क नसलेली 128 शहरं या योजनेद्वारे जोडली जाणार आहेत. त्याप्रमाणेच परवडणा-या किमतीत हवाई प्रवास शक्य होणार आहे. एअर इंडिया, स्पाईस जेट, एअर डेक्कन, एअर ओडिशा आणि टरबो मेघा या पाच हवाई कंपन्या 128 मार्गांवर विमान सेवा सुरू करणार असून, मध्यमवर्गीय जनतेला त्याचा फायदा होणार आहे. या योजनेत महाराष्ट्रातील पाच शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या विमान प्रवासानुसार तासाभराच्या प्रवासासाठी 2500 रुपये आकारण्यात येतील. विमान प्रवासाच्या 500 किलोमीटरच्या एका तासाच्या प्रवासाला 2500 रुपये आकारले जाणार आहेत. तसेच हेलिकॉप्टरच्या 30 मिनिटांच्या हवाई प्रवासालाही 2500 रुपये मोजावे लागणार आहेत. दरवर्षी मुंबईसह महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पर्यटक कुलू-शिमला या थंड हवेच्या ठिकाणी फिरण्यासाठी जातात. सध्या कुलू-शिमला येथे थेट विमानाने जाता येत नाही. दिल्ली किंवा चंदीगडपर्यंत विमानाने गेल्यानंतर तिथून पुढे रस्ते मार्गाने कुलू-शिमल्यापर्यंतचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे या नव्या सुविधेचा पर्यटकांना फायदा होणार असून, त्यांचा वेळ वाचणार आहे. नांदेड-मुंबई, नांदेड -हैदराबाद, नाशिक- मुंबई, नाशिक-पुणे, कोल्हापूर -मुंबई, जळगाव -मुंबई आणि सोलापूर-मुंबई उड्डाण योजनेच्या माध्यामांतून ही विमान सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.