शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

आता सरकार घेणार तुमच्या आॅनलाइन शॉपिंगची माहिती

By admin | Updated: June 14, 2017 01:48 IST

आपण आॅनलाईन शॉपिंग करता का? तर मग सरकारला याची माहिती हवी आहे. पुढील महिन्यात सरकार आपल्या एक्सपेंडिचर सर्व्हेमध्ये प्रथमच

नवी दिल्ली : आपण आॅनलाईन शॉपिंग करता का? तर मग सरकारला याची माहिती हवी आहे. पुढील महिन्यात सरकार आपल्या एक्सपेंडिचर सर्व्हेमध्ये प्रथमच लोकांना ई- कॉमर्स खर्चाबाबत विचारणा करणार आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हे आॅर्गनायजेशन (एनएसएसओ) हा सर्व्हे जुलैमध्ये सुरु करणार आहे. तो जून २०१८ पर्यंत चालणार आहे. देशभरात हा सर्व्हे दरवर्षी होतो. ग्रामीण आणि शहरी भागातून होणाऱ्या विविध प्रकारच्या खरेदीवर हा सर्व्हे आधारित असतो. या सर्व्हेशी संबंधित अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, ई -कॉमर्सचा खर्च एवढा मोठा झाला आहे की, त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. ते या खर्चाला नॅशनल इकॉनॉमिक डाटाबेसमध्ये समावेश करु इच्छितात. नॅशनल एक्सपेंडिचर सर्व्हेमध्ये ५००० हजार शहरी ब्लॉक, ७००० गावातील १.२ लाख घरांचा समावेश करण्यात येणार आहे. याचा राज्यनिहाय डेटाही उपलब्ध होऊ शकेल. डेटा मॅनेजर याचीही माहिती घेतील की, आॅनलाईन खरेदीमुळे महागाई दरावर काही परिणाम होतो का? देशातील ई- कॉमर्सचा आकार अर्थव्यवस्थेवर परिणाम करण्याएवढा मोठा नाही. आॅनलाईन रिटेलचा भविष्यात महागाई इंडेक्सवर काय परिणाम होईल हे या सर्व्हेतून समजणार आहे.750अब्ज डॉलरचे ई कॉमर्स सेक्टर - रेडसीयर कन्सल्टिंगच्या अभ्यासानुसार, २०१६ मध्ये देशात ई कॉमर्स सेक्टर १४.५ अब्ज डॉलरचे होते. देशाचा या माध्यमातून होणारा वार्षिक रिटेल खर्च ७५० अब्ज डॉलरचा आहे. ई- कॉमर्स सेक्टरमध्ये वेगाने वाढ होत आहे. - अमेरिकेतील मार्केट रिसर्च कंपनी फॉरेस्टरचे म्हणणे आहे की, २०२१ पर्यंत एकूण रिटेल सेल्समध्ये आशियाचे आॅनलाईन योगदान २० टक्क्यांपर्यंत असेल. आॅनलाईन रिटेल मार्केटमध्ये आशियात चीन हा सर्वात मोठा देश आहे. पण, भारतातही हे मार्केट वाढत आहे. या सर्व्हेचा उद्देश काय असू शकतो?- तुम्ही काय काय खरेदी करता, किती प्रमाणात खरेदी करता? हे तपासणे.- आॅनलाइन खरेदी आणि विक्रीतून होणाऱ्या व्यवहारावर करस्वरुपातील महसूल वाढवता येऊ शकतो का? याची चाचपणी करणे.- आॅनलाइन व्यवहारांसाठी नियमावली तयार करण्यासाठी, लोकांच्या सवयींचा अभ्यास करणे.