शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

मोदींवरील पुस्तकावर आता बंदीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2016 02:22 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांपैकी अपूर्ण आश्वासनांवर गुजराती भाषेत एक पुस्तक प्रकाशित झाले असून, मोदी यांचे समर्थक

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांपैकी अपूर्ण आश्वासनांवर गुजराती भाषेत एक पुस्तक प्रकाशित झाले असून, मोदी यांचे समर्थक नरसिंहभाई सोळंकी यांनी या पुस्तकावर बंदीसाठी न्यायालयात धाव घेतली आहे.पुस्तकाला विरोध करणाऱ्या सोळंकी यांनी या प्रकरणी मोदी यांनाही पक्षकार बनविले आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पालडी येथील रहिवासी जे.आर. शाह यांनी ‘फेकूजी हवे दिल्लीमा’ (फेकूजी आता दिल्लीत आहे) या शीर्षकाखाली एक पुस्तक लिहिले आणि स्वत:ची कंपनी असलेल्या जे.आर. एंटरप्राईजेसतर्फे ते प्रकाशित केले. हे पुस्तक मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांवर लिहिले आहे. परंतु सामाजिक कार्यकर्ता असल्याचा दावा करणारे बहरामपुरा येथील रहिवासी सोळंकी यांच्या मते या पुस्तकाचे शीर्षक आणि त्यातील मजकूर आक्षेपार्ह आहे. त्यांनी गुरुवारी शहरातील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करून या पुस्तकाचे प्रकाशन आणि विक्रीवर त्वरित बंदी आणण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे. (वृत्तसंस्था)काय आहे आक्षेप?सोळंकी यांचे वकील एम.एस. भावसार यांनी सांगितले की, पुस्तक मोदींच्या अपूर्ण आश्वासनांवर असून मोदी सरकार सत्तेत येऊन फक्त दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. ही आश्वासने पूर्ण करण्यास सरकारकडे भरपूर कालावधी आहे; शिवाय या पुस्तकाचे शीर्षकही आक्षेपार्ह आणि मोदी समर्थकांच्या भावना दुखावणारे आहे. त्यामुळे बंदीची मागणी करण्यात आली आहे.