नवी दिल्ली : कांद्यानंतर सरकारने बटाटय़ाची निर्यात कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत. याअंतर्गत बटाटय़ावर प्रतिटन 45क् डॉलर इतके किमान निर्यात मूल्य आकारले जाणार आहे. बटाटय़ाच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ही उपाय योजना केंद्र सरकारने केली आहे. यामुळे निर्यात कमी होईल, तसेच निर्यात कमी झाल्याने बटाटय़ाची देशांतर्गत उपलब्धता वाढून भाव उतरतील.
परकीय व्यापार महासंचालनालयाने गुरुवारी यासंबंधीची अधिसूचना काढली आहे. यानुसार, बटाटय़ाची निर्यात करण्याची परवानगी असणार आहे. मात्र, ही निर्यात प्रतिटन 45क् डॉलर या किमान निर्यात मूल्यानुसार करणो अनिवार्य आहे. किमान निर्यात मूल्य तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहे.
अन्नधान्याचे दर नियंत्रित करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कांदा व बटाटय़ाच्या निर्यातीवर एमईपीच्या माध्यमातून अंकुश लावण्याची घोषणा केली होती. 17 जून रोजी कांद्यावरील किमान निर्यात मूल्य 3क्क् डॉलर प्रतिटन एवढे होते. यानंतर राजधानी दिल्लीच्या बाजारात बटाटय़ाचे भाव वाढून जवळपास 25.3क् रुपये प्रतिकिलोग्रॅम झाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4भाजीपाला, फळे आणि अन्नधान्य यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीने ठोक विक्री मूल्य निर्देशांकावर आधारित महागाईने मे महिन्यात पाच महिन्यांचा उच्चंक गाठला. या महिन्यात महागाईचा दर 6.क्1 टक्क्यांवर पोहोचला.
4महागाईला आळा घालण्याच्या आश्वासनावर भाजपाने लोकसभा निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळे सरकार महागाई रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहे.