शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये आता रेल्वे कुपनांचा सर्वपक्षीय घोटाळा

By admin | Updated: June 27, 2016 04:28 IST

भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांनी गाजत असलेल्या बिहारमध्ये आणखी एक घोटाळा प्रकाशात आला आहे.

एस.पी.सिन्हा,

पाटणा- भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांनी गाजत असलेल्या बिहारमध्ये आणखी एक घोटाळा प्रकाशात आला आहे. रेल्वे कुपन घोटाळा हे त्याचे नाव असून कोणत्याही एका पक्षाच्या नव्हे तर भाजपसह सर्वच पक्षांच्या आमदारांचा त्यात असलेला सहभाग हे त्याचे वैशिष्ट्य ठरले आहे.कॅगने अहवालात १० कोटींपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा उघड केला असून आमदारांनी पक्षाभिनिवेश बाजूला सारत कूपनाच्या नावावर प्रवासभत्ता लाटत या घोटाळ्याला हातभार लावला. एकूण २२ आमदारांची ओळख पटली असून कॅगने विधानसभा सचिवांच्या भूमिकेबद्दलही गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. कॅगने २०१५-१६ च्या अहवालात बिहार विधानसभेकडून विविध समित्यांवर केलेला खर्च पाहता धक्कादायक तथ्य समोर आणले आहे. १७ समित्यांशी संलग्न आमदारांनी रेल्वे प्रवासाच्या नावावर घोटाळा घडवून आणला. या आमदारांनी बिहार बाहेर दौरे करताना रेल्वे कूपनामार्फत मिळणाऱ्या रेल्वे तिकिटाचा (आरटीसी) प्रयोग करण्याचे टाळत कोणत्याही बिलाविना प्रवासभत्त्याचे कोट्यवधी रुपये पदरात पाडून घेतले. संख्या वाढण्याची शक्यता कॅगचा अहवाल नुकताच मिळाला असून तपासात आमदारांची संख्या वाढू शकते. नितीशकुमार यांच्या सरकारमधील अनेक मंत्री तसेच सत्ताधारी राजद व जदयूचे आमदार अडकण्याची शक्यता पाहता सरकारने कारवाई टाळण्याचे प्रयत्न चालवले आहेत. दुसरीकडे कॅगच्या अहवालाच्या आधारावर मुझफ्फरपूरच्या विशेष निगराणी न्यायालयाने १८ आमदारांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या आमदारांनी प्रवासभत्त्याच्या नावावर सरकारी निधीचा दुरुपयोग केला आहे.