शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आता बेनामी मालमत्ता, सोने खरेदी रडारवर!

By admin | Updated: November 14, 2016 05:52 IST

गेले चार दिवस देशभर बँका व एटीएमबाहेर पैसे बदलून घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागत आहेत. सरकारला याची जाणीव आहे. देशवासीयांनी केवळ ५० दिवस कळ सोसावी.

पणजी/बेळगाव : गेले चार दिवस देशभर बँका व एटीएमबाहेर पैसे बदलून घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागत आहेत. सरकारला याची जाणीव आहे. देशवासीयांनी केवळ ५० दिवस कळ सोसावी. पन्नास दिवसांची स्वच्छता मोहीम पार पडल्यानंतर उंदीरदेखील दिसणार नाही, असे सांगत पुढील टप्प्यात बेहिशेबी मालमत्ता आणि विनापावती सोने खरेदीवरही टाच आणली जाईल, असे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. रविवारी ताळगाव-पणजी येथे मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आपण आणखीही कठोर पावले उचलणार, असे सांगून मोदी म्हणाले, काळ्या पैशांविरुद्ध आम्ही युद्ध लढत आहोत. ३० डिसेंबरनंतरही हे युद्ध संपणार नाही. मी माझ्या निर्णयांबाबत देशाला अंधारात ठेवले नव्हते. विदेशातील काळ्या पैशांविरुद्ध पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत एसआयटी नेमली होती. त्या वेळीच माझे इरादे स्पष्ट झाले होते. जन-धन योजनेद्वारे सर्वांची बँक खाती उघडण्यामागेही काळ्या पैशांविरुद्ध पाऊल उचलणे, हाच हेतू होता. अनेक धनिक काळ्या पैशांद्वारे बेनामी मालमत्ता खरेदी करतात. त्यांचीही गय केली जाणार नाही. बिल्डरांचा दोष नाही. मालमत्ता विकणे हे त्यांचे कामच आहे; पण बेनामी मालमत्ता सरकार ताब्यात घेईल, कारण ती देशाची मालमत्ता आहे. ...तर मतदारसंघात जाणे मुश्किलदोन लाख रुपयांपेक्षा जास्त सोने विक्री करण्यासाठी पॅनकार्डची सक्ती केल्यानंतर अर्ध्यापेक्षा अधिक संसद सदस्यांनी माझ्याशी संपर्क करून यातून सूट देण्याची मागणी केली होती. ज्या लोकांनी कधी आपल्या विधवा आईकडे लक्ष दिले नाही ते लोक आज त्या आईच्या खात्यात अडीच लाख रुपये जमा करीत आहेत. ज्या दिवशी मी अशी नावे जाहीर करील त्या दिवशी त्यांना आपल्या मतदारसंघात जाणे मुश्किल होईल, असा गर्भित इशाराही मोदी यांनी दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)