नालेसफाईनंतर आता रस्ते पाहणीवर जोर
By admin | Updated: May 18, 2015 01:16 IST
नालेसफाईनंतर आता रस्ते पाहणीवर जोर
नालेसफाईनंतर आता रस्ते पाहणीवर जोर
नालेसफाईनंतर आता रस्ते पाहणीवर जोरमुंबई : ऐन पावसाळ्यात नाले तुंबण्यासह रस्ते उखडून मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून महापालिकेने आता नालेसफाईसह येथील रस्त्यांच्या पाहणीवरही जोर दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह आयुक्त अजय मेहता यांनीही नालेसफाईच्या कामासह रस्ते पाहणीचा धडका लावला आहे.पावसाळ्यात नाले तुंबून परिसर जलमय होऊ नये म्हणून महापालिकेच्या वतीने मे महिन्यातच नालेसफाईचे काम हाती घेतले जाते. पावसाळ्यापूर्वी ६० टक्के, पावसाळ्यात २० टक्के आणि उर्वरित काळात २० टक्के अशा पध्दतीने नालेसफाचे काम केले जाते. आतापर्यंत नालेसफाईचे काम ६० टक्के झाल्याचा दावा पालिकेने केला असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी नालेसफाईच्या कामांची पाहणी केली आहे. शिवाय आयुक्तांनी त्यानंतरही पश्चिम उपनगरातील नाल्यांसह रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. आणि आता १८ मे (सोमवार) महापौर स्नेहल आंबेकर शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रस्त्यांच्या कामांची पाहणी करणार आहेत. महापौरांचा पाहणी दौरा ठक्कर कॅटर्स, बिर्ला क्रिडा केंद्र, गिरगाव चौपाटी येथून सोमवारी रात्री ८ वाजता सुरु होणार आहे.दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वी नाल्यांसह रस्त्यांच्या कामांची पाहणी करणे हा नित्यनियमाचा भाग झाला असून, यावर्षीही त्याची रि ओढण्यात आली आहे. परिणामी यावर्षी होत असलेल्या नालेसफाई आणि रस्तेदुरुस्तीच्या कामानंतर ऐन पावसाळ्यात समस्यांना सामोरे जावे लागणार नाही, असा आशावाद मुंबईकरांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)....................................