शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

४ हजार व्यावसायिकांना करनिर्धारणाच्या नोटिसा मनपाचा एलबीटी विभाग : आर्थिक उत्पन्नात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2016 00:05 IST

जळगाव : मनपाच्या एलबीटी विभागातर्फे २०१३-२०१४ व तसेच २०१४-२०१५ सालात शहरातील सुमारे चार हजार व्यावसायिकांनी अद्याप विवरण पत्र सादर केलेले नाहीत. त्यापार्श्वभूमीवर संबंधितांना स्मरण देण्यासाठी मनपा प्रशासनातर्फे त्यांना करनिर्धारणाच्या नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत.

जळगाव : मनपाच्या एलबीटी विभागातर्फे २०१३-२०१४ व तसेच २०१४-२०१५ सालात शहरातील सुमारे चार हजार व्यावसायिकांनी अद्याप विवरण पत्र सादर केलेले नाहीत. त्यापार्श्वभूमीवर संबंधितांना स्मरण देण्यासाठी मनपा प्रशासनातर्फे त्यांना करनिर्धारणाच्या नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत.
जळगाव शहरात एकूण एकूण ८ हजार व्यावसायिक आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना दरवर्षी विवरण पत्र सादर करणे अनिवार्य आहे. परंतु, गेल्या दोन वर्षात अनेक व्यावसायिकांनी त्या नियमाकडे दुर्लक्ष केल्याची माहिती समोर आली आहे.
३१ मार्चपर्यंत मुदत
ज्या व्यावसायिकांनी विवरण पत्र सादर केलेले नाही. त्यांनी तत्काळ सादर करण्याचे मनपातर्फे सूचित करण्यात आले आहेत. त्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. व्यावसायिकांना सुरुवातीला इन्कमटॅक्स विभागाकडे विवरण पत्र द्यावे लागते. त्याची पडताळणी झाल्यानंतर हे पत्र मनपाच्या एलबीटी विभागाकडे प्राप्त होते. परंतु, अद्याप इन्कमटॅक्स विभागाकडेही व्यावसायिकांचे विवरण पत्र प्राप्त झालेले नाहीत.
मनपाच्या आर्थिक उत्पन्नात घट
शासनाने दरवर्षी ५० कोटी उलाढाल असलेल्या कंपनी व व्यावसायिकांना स्थानिक संस्था कर भरावा लागेल, असे सूचित केले आहे. त्यानुषंगाने विचार केला तर जळगाव शहरात २८ व्यावसायिक येत होते. कालांतराने शासनाने पेट्रोल व डिझेलवरची एलबीटीही रद्द केल्याने जळगाव शहरातील ३ व्यावसायिकांकडून प्राप्त होणारे उत्पन्नही मनपाला मिळणे बंद झाले आहे. सद्य:स्थितीत आता ५० कोटी पेक्षा जास्त उलाढाल असलेले २५ व्यावसायिक शहरात आहेत. त्यांच्याकडून मनपाला दरमहा ८५ लाख रुपये कर स्वरूपात मिळत आहे. पूर्वी २८ व्यावसायिकांकडून मनपाला १ कोटीहून अधिक कर मिळत होता. त्यामुळे मनपाच्या आर्थिक उत्पन्नात घट झाली आहे.