शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवेढा,माढ्याच्या उपनिबंधकांना नोटिसा

By admin | Updated: June 26, 2015 01:26 IST

विकास सोसायट्यांच्या याद्याबाबत तक्रारी : तीन दिवसात खुलासा देण्याची मुदत

विकास सोसायट्यांच्या याद्याबाबत तक्रारी : तीन दिवसात खुलासा देण्याची मुदत
सोलापूर: विकास सोसायट्यांच्या निवडणुकीसाठी मतदारांच्या याद्याबाबत तक्रारींची दखल घेत नसल्याने मंगळवेढा व माढ्याच्या उपनिबंधकांना जिल्हा उपनिबंधकांनी नोटीस बजावली आहे. तीन दिवसात खुलासा सादर केला नाही तर कारवाई करण्यात येईल असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
सध्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. गावोगावच्या विकास सोसायट्यांचा त्यामध्ये समावेश आहे. आजपर्यंत पुढार्‍यांच्या ताब्यात सोसायटी निवडणूक प्रक्रिया असल्याच्या निवडणुका कागदावरच दाखविल्या जात असल्याचे चित्र होते. ते बदलण्यासाठी आता सहकार खात्याकडे प्राधिकरण स्थापन केले आहे. प्राधिकरणामार्फत निवडणुका होत असल्या तरी पुढारी हातचलाखी करीतच आहेत. गावपातळीवर सेक्रेटरीला हाताशी धरुन विरोधी सदस्यांना थकबाकीच्या यादीत टाकून वगळणे तर आपल्या मर्जीतील नव्याने सभासद यादीत घुसडण्याचा प्रकार अनेक ठिकाणी होत आहे. यामुळेच अनेक ठिकाणच्या विकास सोसायट्यांच्या मतदार यादीबाबत तक्रारी जिल्हा उपनिबंधक व जिल्हाधिकार्‍यांकडे आल्या आहेत. मंगळवेढा तालुक्यातील मरवडे, नंदूर, मारोळे, खोमनाळ, आंधळगावसह अन्य गावात असे प्रकार झाले आहेत. माढा तालुक्यातूनही अशा प्रकारच्या तक्रारी आल्या आहेत. तालुका पातळीवर बोगस सभासदांबाबत दिलेल्या तक्रारीचे निराकरण केले जात नाही व सभासदांची यादी जिल्हा उपनिबंधकाकडे पाठवली जाते. दावे हरकतीबाबत वरिष्ठ कार्यालयाला माहिती न देणे, यासाठी पाठपुरावा केल्यानंतरही जाणूनबुजून दुर्लक्ष करणे, आपण व आपल्या कर्मचार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्याचे प्रकार झाले असल्याचे नोटिसीमध्ये म्हटले आहे. यामुळे मंगळवेढ्याचे सहायक निबंधक बी.एस. कटकधोंड व माढ्याचे ए.बी.थोरात यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत होणार्‍या गंभीर बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे.
चौकट
सहकारी प्राधिकरणाचीही नाराजी
चुकीच्या पद्धतीने होणार्‍या मतदार यादीला आक्षेप घेतल्यानंतरही त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने तक्रारदारांनी सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडेही तक्रारी केल्या आहेत. वारंवार तक्रारी वरिष्ठांकडे जात असल्याने प्राधिकरणानेही अशा अधिकार्‍यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.
कोट
मरवडे विकास सोसायटीच्या यादीत बोगस नावाचा समावेश केला आहे. याबाबत तक्रारी दिल्यानंतरही दखल घेतली जात नाही. याप्रमाणेच तालुक्यातील अन्य गावातही असाच प्रकार झाला आहे. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत.
रजाक मुजावर
उपसरपंच, मरवडे,ता. मंगळवेढा