शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

इच्छामरणप्रकरणी कोर्टाची राज्यांना नोटीस; केंद्र म्हणते, ही आत्महत्या

By admin | Updated: July 17, 2014 00:40 IST

इच्छामरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी याप्रकरणी सर्व राज्य सरकारे व केंद्र शासित प्रदेशांना नोटीस जारी केली़

नवी दिल्ली : इच्छामरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी याप्रकरणी सर्व राज्य सरकारे व केंद्र शासित प्रदेशांना नोटीस जारी केली़ याचदरम्यान केंद्र सरकारने इच्छामरणाला कायदेशीर मान्यता देण्यास प्रखर विरोध नोंदवला़ इच्छामरण ही आत्महत्या असून देशात याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, अशी भूमिका केंद्राने घेतली़कृत्रिम श्वसनप्रणालीवर जगणाऱ्या आणि वैद्यकीयदृष्ट्या निष्क्रिय अवस्थेतील रुग्णाला इच्छामरणाचा अधिकार द्यावा, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास आज सरन्यायाधीश आऱएम़ लोढा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने सहमती दर्शवली़ तथापि याप्रकरणी राज्यांचीही बाजू ऐकली जावी़ कारण हा केवळ राज्य घटनेचा नाही तर नैतिकता, धर्म आणि वैद्यकीय शास्त्राशीही निगडित मुद्दा आहे, असे खंडपीठाने यावेळी म्हटले़ सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने संबंधित याचिकेला प्रखर विरोध केला़ इच्छामरण हा आत्महत्येचाच एक प्रकार आहे आणि आत्महत्या देशात गुन्हा आहे़ त्यामुळेच याला कायदेशीर मान्यता दिली जाऊ शकत नाही, अशी ठाम भूमिका केंद्राने घेतली़ इच्छामरणास कायदेशीर मान्यता दिल्यास याचा दुरुपयोग होऊ शकतो. या मुद्यावर संसदेत चर्चेनंतर निर्णय घेतला जावा़ हा न्यायालय निर्णय देऊ शकेल, असा हा मुद्दा नाही, असे केंद्राची बाजू मांडताना अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी म्हणाले़ यावर कायद्याचा दुरुपयोग होण्याची भीती हा इच्छामरणाला कायदेशीर दर्जा न देण्याचा आधार ठरू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले़यादरम्यान न्यायालयाने माजी सॉलिसीटर जनरल टी़ आऱ अंद्यार्जुना यांना इच्छामरणाला कायदेशीर मान्यता देण्याच्या मुद्यावर मदत करण्यासाठी ‘न्यायमित्र’ नियुक्त केले़(लोकमत न्यूज नेटवर्क)