शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकासह चौघांना वेतनवाढ बंदची नोटीस

By admin | Updated: September 26, 2014 01:54 IST

बीड : येथील चंपावती शाळेत उपशिक्षणाधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता़ याप्रकरणाची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली असून शुक्रवारी मुख्याध्यापकांसह

बीड : येथील चंपावती शाळेत उपशिक्षणाधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता़ याप्रकरणाची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली असून शुक्रवारी मुख्याध्यापकांसह चौघाची एक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद करण्याची नोटीस दिली आहे़माध्यमिक विभागाचे शिक्षक संजय खाडे हे शहीद भगतसिंग विद्यालयात अतिरिक्त ठरले होते़ त्यानंतर त्यांना चंपावती विद्यालयात सामावून घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते़ मात्र, संस्था त्यांना काही रुजू करुन घेण्यास तयार नव्हती़ त्यामुळे बुधवारी शिक्षण विभागाचे पथक चंपावती विद्यालयात खाडे यांना रुजू करण्यासाठी गेले होते़ यावेळी डॉ़ साहेबराव भोपळे यांनी उपशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे यांना धक्काबुक्की केली होती़ शिवाय मुख्याध्यापक हौस्राव पवार यांचे मस्टरही पळविले होते़ गुरुवारी शिक्षणाधिकारी लता सानप यांनी धक्काबुक्की प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज मागवून वरिष्ठांचे आदेश न पाळल्याने संस्थेची मान्यता काढण्याची तंबी दिली होती़शुक्रवारी शिक्षणाधिकारी सानप यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून मुख्याध्यापक हौसराव पवार, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, मुख्य लिपिक यांची एक वेतनवढ कायमस्वरुपी बंद करण्याची नोटीस बजावली़ या नोटिशीचा तीन दिवसात खुलासा करण्यास सांगितले आहे़ खुलासा न केल्यास एकतर्फी कारवाई केली जाईल, अशी तंबीही दिली आहे़ याशिवाय धर्मादाय आयुक्त यांच्याकडून संस्थेची अधिकृत कार्यकारिणी नेमकी कोणती? याची माहितीही मागवून घेतली आहे़पोलीस अधीक्षकांनाही पत्रचंपावती शाळेत घडलेल्या प्रकरणाची संपूर्ण माहिती शिक्षणाधिकार लता सानप यांनी एका पत्राद्वारे पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनाही कळवली़ (प्रतिनिधी)चंपावती शाळेने वरिष्ठ लिपिक संजय कुलकर्णी यांना चंपावती संस्थेने मानधनस्वरुपात संस्थेने घेतले होते़४मात्र, मानधनाऐवजी थेट वेतनश्रेणी मंजूर केली़ माध्यमिक शिक्षण विभागाच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी रक्कम वसूल करण्यासाठी चंपावती शाळेला पत्र पाठविले़४कुलकर्णी यांनी वेतनापोटी तब्बल तीन लाखाहून अधिक रुपये उचलले आहेत़ ही रक्कम वसूल केली जाणार आहे, असे शिक्षणाधिकारी (मा़) लता सानप यांनी दिली़