शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नोट बंदीमुळे होणाऱ्या 'पेन' पेक्षा 'गेन' अधिक - नरेंद्र मोदी

By admin | Updated: November 13, 2016 15:51 IST

नोटबंदीच्या निर्णयामुळे होत असलेल्या पेन (त्रास) पेक्षा त्यातून देशाला होणारा 'गेन' (लाभ) अधिक असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.

ऑनलाइन लोकमत
बेळगाव, दि.  13 -  पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयामुळे देशातील सर्वसामान्य देशवासीयांना त्रास होत आहे. नोटा बदलून घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. तुम्हाला नोट बंदीमुळे 'पेन' होतोय. याची मला जाणीव आहे. पण या निर्णयामुळे होत असलेल्या पेन (त्रास) पेक्षा त्यातून देशाला होणारा 'गेन' (लाभ) अधिक असेल, असे पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी आज सांगितले. 
 अचानक घेण्यात आलेल्या 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे देशात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.  एटीएममधून कमी प्रमाणात निघत असलेले पैसे आणि बँकांसमोरील लांबच लांब रांगा यामुळे सर्वसामान्य त्रस्त आहेत. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान आज काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, गोव्यात केलेल्या भाषणात नोटबंदीमुळे त्रस्त असलेल्या देशवासीयांना 50 दिवस कळ सोसण्याचा सल्ला दिल्यानंतर पंतप्रधानांनी बेळगाव येथे बोलताना नोटबंदीमुळे सध्या त्रास होत असला, तरी त्यातून देशाला मोठा फायदा होईल, असे सांगितले. 
(काळा पैसा बाहेर काढण्यासाठी 30 डिसेंबरनंतरही उपाययोजना)  

 

येथील भाषणात पंतप्रधानांनी नोटबंदीवर टीका करणाऱ्या काँग्रेसवर टीका केली ते म्हणाले, "काँग्रेसची कुवत चार आणे बंद करण्याचीच होती. बेईमान लोक आणि बेईमानीला देश वैतागलाय. बदलत्या काळाबरोबर देशात कॅशलेस व्यवहार वाढण्याची आवश्यकता आहे."  तसेच 500 आणि एक हजार रुपयांच्या  नोटांवर बंदी घातल्यानंतर कुणी बँक खात्यात पैसे जमा करून काळ्या पैशाचे पांढरे करू इच्छीत असेल, तर त्याच्यावर कठोर कारवाई होईल. असा इशाराही पंतप्रधानांनी दिला. त्याआधी गोव्यातील सभेत बोलताना पंतप्रधानांनी 50 दिवसांनंतर माझा हा निर्णय चुकीचा वाटल्यास मी शिक्षा भोगण्यास तयार आहे, असे म्हटले होते.