शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२0१९ मध्ये भाजपाविरोधी पक्षांची आघाडी होईलच, याची खात्री नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 05:21 IST

कर्नाटकातील जनता दल व काँग्रेस यांच्या सरकारमध्ये कुरबुरी सुरू झाल्यानंतर माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी विरोधी ऐक्याबाबतच साशंकता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : कर्नाटकातील जनता दल व काँग्रेस यांच्या सरकारमध्ये कुरबुरी सुरू झाल्यानंतर माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी विरोधी ऐक्याबाबतच साशंकता व्यक्त केली आहे. आपले पुत्र कुमारस्वामी यांच्या शपथविधीला सर्व विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले, याचा अर्थ ते एकत्रित निवडणुका लढवतीलच, असे नाही, असे देवेगौडा यांनी म्हटले आहे.कुमारस्वामी यांच्या सरकारपुढे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या आव्हान उभे करीत असून, संपूर्ण अर्थसंकल्प मांडण्याच्या कुमारस्वामी यांचा निर्णयही सिद्धरामय्या यांना अमान्य आहे. त्यामुळे धर्मशाळामध्ये त्यांनी आपल्या काही समर्थकांना बोलावूनही घेतले होते. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या पक्षाला गृहित धरू नये, असा इशाराही माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी दिला आहे.आमचे काँग्रेसशी मतभेद आहेतच. तरीही आम्ही एकत्र येऊ न लोकसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांत अजिबातच चर्चा झालेली नाही. मात्र, कुमारस्वामी व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी एकत्र बसून, त्याबाबत निर्णय घेतली, असे सांगून, त्यांनी २0१९ मध्ये दोन पक्षांची आघाडी कायम राहतील, असे संकेत दिले, तसेच भाजपाप्रणित सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नसलेल्या पक्षांच्या नेत्यांनी आपण भेटणार आहोत, असेही देवेगौडा यांनी स्पष्ट केले.सर्वत्र आघाडी अशक्यचमे महिन्यात बंगळुरूमध्ये झालेल्या कुमारस्वामी यांच्या शपथविधीला काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपा, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, तेलुगू देसम, भाकप अशा अनेक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यातून विरोधी ऐक्याचे दर्शन घडले होते. पण त्यानंतर निवडणुकांबाबत चर्चा झालेली नाही.पश्चिम बंगालमध्ये तृणमूल व डावे पक्ष एकत्र येणे अशक्य आहे, केरळमध्ये डावे पक्ष व काँग्रेस एकमेकांच्या विरोधात लढणार, हे निश्चित आहे.पंजाब, दिल्लीतही आप व काँग्रेस परस्परांविरोधातच लढतील. युपीत सपा व बसपा हे पक्ष एकत्र आले तरी ते काँग्रेसला फार जागा देण्यास तयार नाहीत. त्यामुळे २0१९ मध्ये भाजपाच्या विरोधात सर्वत्र आघाडी होणे अशक्यच दिसते.उत्तर प्रदेश : लोकसभेसाठी सपा व बसपा यांच्यात प्रत्येकी ४0 जागा लढविण्यावरून चर्चा सुरू आहे.पश्चिम बंगाल : तृणमूल व काँग्रेस एकत्रितपणे लोकसभा निवडणुका लढतील, असे दिसत आहे.महाराष्ट्र : काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र यायच्यातयारीत असले तरी त्यांचा निर्णय व्हायचा आहे.आंध्र प्रदेश : तेलगू देसम व तेलंगणातील तेलंगणा राष्ट्रीय समिती यांनी आपली भूमिकाच स्पष्ट केलेली नाही.