शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

आचारसंहितेमुळे यंदा चित्ररथ नाही प्रजासत्ताक दिन : केवळ शालेय सांस्कृतिक कार्यक्रम होणार

By admin | Updated: January 26, 2017 02:07 IST

जळगाव : प्रजासत्ताक दिनी दरवर्षी ध्वजारोहणाच्या प्रमुख कार्यक्रमाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शासकीय योजनांच्या चित्ररथांचा सहभाग असतो. मात्र यंदा आचारसंहितेमुळे राजकीय पक्षांनी जाहीर केलेल्या योजनांचा प्रचार होऊ नये यासाठी या कार्यक्रमातून चित्ररथांना वगळण्यात आले आहे.

जळगाव : प्रजासत्ताक दिनी दरवर्षी ध्वजारोहणाच्या प्रमुख कार्यक्रमाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शासकीय योजनांच्या चित्ररथांचा सहभाग असतो. मात्र यंदा आचारसंहितेमुळे राजकीय पक्षांनी जाहीर केलेल्या योजनांचा प्रचार होऊ नये यासाठी या कार्यक्रमातून चित्ररथांना वगळण्यात आले आहे.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाची प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्या हस्ते प्रशासनाचा ध्वजारोहरण सोहळा होईल. यानंतर प्रमुख ध्वजारोहणाचा सोहळा सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी पोलीस मुख्यालयाच्या क्रीडांगणावर होणार आहे. यावेळी प्रमुख कार्यक्रमाच्या वेळी ध्वजारोहणास कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे उपस्थित रहाणार आहेत. हा संपूर्ण कार्यक्रम ४४ मिनिटांचा असेल.
चित्ररथ वगळले
प्रमुख ध्वजारोहणाच्या या सोहळ्यात गेल्या वर्षी जवळपास १० चित्ररथांचा सहभाग होता. यात महसूल प्रशासनाचा राजस्व अभियान, सात-बारा संगणकीकरण, जलसिंचन विभागाचा चित्ररथ, कृषी माहितीवर आधारीत कृषी विभागाचा चित्ररथ सहभागी होता मात्र या वर्षी हे चित्ररथ वगळण्यात आले आहेत. आचारसंहिता असल्यामुळे चित्ररथाव्दारे राजकीय पक्षाने जाहीर केलेल्या योजनांचा प्रचार, प्रसार होऊ नये तसेच चित्ररथावर कोणत्याही राजकीय नेत्याचे छायाचित्र असू नये यासाठी यंदा हे चित्ररथ प्रजासत्ताक दिन मुख्य कार्यक्रमातून वगळण्यात आले आहेत.
------
असे होणार कार्यक्रम
४४ मिनिटांच्या कार्यक्रमात ला.ना. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे योगा पिरॅमिड, नंदिनीबाई वामनराव मुलींच्या विद्यालयाच्या विद्यार्थीनींचे लेझीम नृत्य, पोलीस बॉईजचे कराटे प्रात्यक्षिक, प.न. लुंकड कन्या शाळेच्या विद्यार्थीनींचे देशभक्तीपर गाण्यावर नृत्य, ला.ना. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सर्वधर्म समभावावर मुक नाट्य, शानबाग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या बॅँड पथकाचे सादरीकरण, ए.टी. झांबरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले वंदे मातरम गीत, ला.ना. विद्यालयातील महिला शिक्षीकांनी सादर केलेले भारत हमारी मॉ है हे देशभक्तीपर गती यावेळी सादर होईल.